<
एरंडोल(शैलेश चौधरी)-कोल्हापुर येथील प्रचंड भयावह पूरपरीस्थिती तसेच झालेले नुकसान पाहता समाजमन सुन्न झाले होते,कोणाचा अख्खा संसार पाण्याखाली गेला तर कुणाची दावणीला बांधलेली पाळीव जनावरे पाण्यात तडफडून मेली… एकंदरीतच काळ ओढवला, दळण-वळण बंद झाले. आणी माणूसकी जागी झाली याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे एरंडोल शहरातील मैत्री संघ परीवार या संघटनेच्या सागर महाजन,पियुष चौधरी,शुभम महाजन, साहिल पिन्जारी,तुषार महाजन,पंकज पाटिल ,निखिल वाणी व सर्व कार्यकर्ते या स्वयंस्फूर्त तरूणांनी कोल्हापूर शहरातील आपत्ग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन केले,व मदत संकलन केंद्र उभारण्यात येऊन मदत जसे खाण्याच्या वस्तू,अंथरूण-पांघरूण व जिवनावश्यक वस्तूंचे संकलन केले व एकञित झालेली मदत ही एका वाहनाद्वारे कोल्हापूरकडे रवाना करण्यात आली.