<
म्हसावद – (सुमित पाटील) – ता.जळगाव दि.२१ येथील स्वा.सै पं ध.थेपडे उच्च माध्यमिक विद्यालयात इ.१२वी च्या विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनींनी मिळून रक्षाबंधन कार्यक्रम साजरा केला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात श्री.वाय.पी.चिंचोरे सरांनी रक्षाबंधन या बहीण-भावाच्या पवित्र सणाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले.तसेच सदर कार्यक्रम घडवून आणल्याबद्दल प्राचार्य श्री.सोनार सर यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले.विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.भंगाळे सर यांनी बहिण भावाचे अतुट नात्याचे महत्व सांगून हे नाते अधिक घट्ट कसे राहिल या विषयी मार्गदर्शन केले.
श्री.एस.जे.पवार सर यांनी आजचा हा कार्यक्रम म्हणजे पवित्र भारतीय सस्कार व सस्क्रुतीचे उत्तम उदाहरण असून विद्यार्थी जीवनातील कायमस्वरूपी स्मरणातला दिवस ठरेल याची जाणीव विद्यार्थ्यांना करून दिली.इ.१२वी विद्यार्थिनींनी सुरवातीला शिक्षकांना राख्या बांधून विद्यार्थ्यांना राख्या बांधल्या.कॉलेजकडून सर्व विद्यार्थ्यांना नास्ता व विद्यार्थिनींना रक्षाबंधनाची भेट म्हणून पेन वाटप करण्यात आले.
कार्यक्रमात आभार श्री.निलेश पवार सरांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी ज्यू.कॉलेजच्या सर्व शिक्षक बंधू भगिनींनी मेहनत घेतली.रक्षाबंधन कार्यक्रमाला सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या आनंदाने व उत्साहाने सहभाग नोंदवला.