Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अनुसुचित जाती व जमातीच्या शेतकऱ्यांनी सिंचन सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
23/08/2021
in राज्य
Reading Time: 1 min read


जळगाव, (जिमाका) दि. 23 – अनुसुचित जाती/नवबौध्द तसेच आदिवासी शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी शासनाने अनुसुचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व आदिवासी शेतकऱ्यांसाठी बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील सन 2021-2022 या वर्षात राबविण्यात येत आहे. या योजनेत अनुसुचित जाती व जमातीच्या शेतकऱ्यांना विविध घटकांसाठी अनुदान देण्यात येणार असून याकरीता पात्र शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर करावेत. असे वैभव शिंदे, कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.


डॉ. बाबासोहब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेतंर्गत नवीन विहिरीसाठी 2 लाख 50 हजार, जुनी विहिर दुरुस्तीसाठी 50 हजार, इनवेल बोअरिंगकरीता 20 हजार, पंप संचासाठी 20 हजार, वीज जोडणी आकारकरीता 10 हजार, शेततळयांचे प्लॅस्टिक अस्तरीकरणासाठी 1 लाख, सुक्ष्म सिंचन संच अतंर्गत (90 टक्के अनुदान) ठिबक संच 50 हजार तर तुषार संचाकरीता 25 हजार रुपये अनुदान मर्यादा आहेत.


बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेतंर्गत नवीन विहिरीसाठी 2 लाख 50 हजार, जुनी विहिर दुरुस्तीसाठी 50 हजार, इनवेल बोअरिंगकरीता 20 हजार, पंप संचासाठी 20 हजार, वीज जोडणी आकारकरीता 10 हजार, शेततळयांचे प्लॅस्टिक अस्तरीकरणासाठी 1 लाख, सुक्ष्म सिंचन संच अतंर्गत (90 टक्के अनुदान) ठिबक संच 50 हजार तर तुषार संचाकरीता 25 हजार रुपये परस बागेकरीता 500 रुपये तर एच.डी.पी.ई/पीव्हीसी पाईपकरीता 30 हजार रुपये अनुदान मर्यादा आहेत. निवड केलेल्या लाभार्थीस नवीन विहिर, जुनी विहिर दुरुस्ती, शेततळयांचे प्लॅस्टिक अस्तरीकरण यापैकी एका पॅकेजचा लाभ घेता येईल.


योजनेच्या लाभाकरीता पात्रतेच्या अटी/आवश्यक कागदपत्रे
स्वत:चे नावे 7/12 उतारा व 8 अ उतारा, ड-पत्रक (नविन विहिरीसाठी किमान 0.40 हे. व इतर बाबीसाठी 0.20 हे. व कमाल 6 हेक्टर जमीन क्षेत्र मर्यादा), तहसिलदार/प्रांताधिकारी यांचा अनुसुचित जातीचा दाखला (डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना) अनुसूचित जमातीचा जातीचा दाखला (बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेसाठी), तहसिलदार यांचा मागील वर्षाचा उत्पनाचा दाखला (रु.1 लाख 50 हजार मर्यादा), आधारकार्ड, आधारलिंक बँक खाते क्रमांक, 7/12 उताऱ्यावर इतर हक्कदार असतील तर त्यांचे कार्यकारी दंडाधिकारी समक्षचे संमतीपत्र 100/- च्या स्टॅम्पवर, 1 मे 2001 नंतर 3 रे अपत्य झालेले नसल्याबाबतचा ग्रामसेवकाने दिलेला दाखला/लाभार्थीचे प्रतिज्ञापत्र, ग्रामसभा ठराव, रेशनकार्ड आदि कागदपत्रे आवश्यक आहेत. यापूर्वी शासकीय योजनेतून विहिरीचा लाभ घेतला असल्यास व 7/12 उताऱ्यावर पुर्वीची विहिरीची नोंद असल्यास विहिरीचा लाभ घेता येणार नाही.


योजनेत सहभागी होण्यासाठी अनुसुचित जाती/नवबौध्द व आदिवासी शेतकऱ्यांनी महा ई-सेवा केंद्रावरुन www.mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरावा. लाभार्थी निवड ऑनलाईन होणार आहे. योजनेच्या अधिक माहितीसाठी शेतकरी बंधूनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किंवा कृषि अधिकारी यांचेशी संपर्क साधावा. असे वैभव शिंदे, कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

राज्यात कलाकेंद्र, आठवडे बाजार आणि यात्रा लवकर सुरु करण्याबाबत शासन सकारात्मक – सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख

Next Post

दुचाकी वाहनांसाठी नवीन पसंती क्रमांक मालिका सुरु

Next Post

दुचाकी वाहनांसाठी नवीन पसंती क्रमांक मालिका सुरु

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo