<
जामनेर-(प्रतिनिधी) – तालुक्यात आरोग्य यंत्रणेने आज एकाच दिवशी ग्रामीण भागात 3380 नागरिकांना ऑनलाईन नाव नोंदणी करून कोरोना लस देण्याचा उच्चाक प्रस्थापित केला.विषेश म्हणजे यामध्ये उपजिल्हा रुग्णालय जामनेर व ग्रामीण रुग्णालय पहुर येथे लस साठा उपलब्ध नसल्याने आज या दोन ठिकाणी लसीकरण बंद होते. तरी ग्रामीण आरोग्य यंत्रणेने हा उच्चाक केला आहे.
वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांची कर्तव्य तत्परता उपकेंद्र वैद्यकीय अधिकारी यांनी घेतलेली मेहनत तसेच नागरिकांशी असलेला सुसंवाद व ग्रामपंचायतीचे अनमोल सहकार्य व योग्य नियोजन यामुळे लसीकरणाचा उच्चाक गाठता आला असे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांनी सांगितले.
प्राथमिक आरोग्य केंद्र नेरी-1020
प्राथमिक आरोग्य केंद्र फत्तेपुर- 500
प्राथमिक आरोग्य केंद्र शेंदूर्णी -500
प्राथमिक आरोग्य केंद्र वाकोद -440
प्राथमिक आरोग्य केंद्र वाकडी- 320
प्राथमिक आरोग्य केंद्र गारखेडा-300
प्राथमिक आरोग्य केंद्र बेटावद -300
याप्रमाणे आज कोरोना लसीकरण करण्यात आले.
जामनेर तालुक्यात आज सकाळच्या अहवालानुसार
कोव्हिशिल्ड
पहिला डोस 49509
दुसरा डोस 15355
कोव्हॅसीन
पहिला डोस 4534
दुसरा डोस 2896
असे एकूण 72294 नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे. जिल्हा स्तरावरून कोरोना लस मिळाल्यानंतर तात्काळ उपकेंद्र स्तरापर्यंत पोहचवून त्याच दिवशी आरोग्य कर्मचाऱ्यांकडून सर्व लस उपयोगात आणली जाते म्हणजे पुन्हा नवीन लस साठा उपलब्ध होतो.
अपूर्ण सुविधा व मनुष्यबळा ची कमतरता असतांना सुद्धा आरोग्य कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामकाजाचे तालुक्यातुन सर्व स्तरातून व जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांकडुन कौतुक होत आहे.
500 व 500 ते 1000 लोकसंख्या असणाऱ्या गावांचे प्राधान्याने लसीकरण पूर्ण करण्याबाबत वरिष्ठ कार्यालयाच्या सुचना आहेत.तसेच ज्याचा पहिला डोस झाला आहे व नियानुसार दुसरा डोस घेणे बाकी असलेले लाभार्थी, गरोदर माता, स्तनदा माता, जेष्ठ नागरिक ,दिव्यांग अशांना आरोग्य विभागाच्या वतीने प्राधान्याने डोस देण्यात येईल असे आरोग्य विभागाच्या वतीने कळवण्यात आले आहे.