<
मानवाने केलेली निसर्गाची हानी भरून काढण्यासाठी प्रत्येकाने कमीत-कमी महिन्यातील एक दिवस निसर्ग संवर्धनासाठी दिला पाहिजे– अँड. शिवदास कोचुरे
रावेर/ता.प्रतिनिधी-दि.27 विनोद कोळी
नेचर हार्ट फाउंडेशन ने सामाजिक वनीकरण प्रादेशिक विभाग जळगाव यांच्या सहकार्याने पाचशे वृक्षांचे रोपण पिंप्रीपंचम परिमंडळ डोलारखेडा, वडोदा वनक्षेत्र ता. मुक्ताईनगर येथे करण्यात आले.
युवकांना व स्वयंसेवकांना संदेश देतांना नेचर हार्ट फाउंडेशन चे अध्यक्ष अँड. शिवदास कोचुरे म्हणाले की, मानवाने स्वतःची प्रगती साधण्यासाठी निसर्गाची मोठ्या प्रमाणावर हानी केलेली आहे. मानवाने केलेली निसर्गाची हानी भरून काढण्यासाठी प्रत्येकाने कमीत-कमी महिन्यातील एक दिवस निसर्ग संवर्धनासाठी दिला पाहिजे. तसेच मानवाच्या सुरक्षित भविष्यासाठी वृक्षरोपण व त्याचे संवर्धन झाले पाहिजे.
सदरील वृक्षरोपण कार्यक्रम प्रसंगी,590 सी वनविभागाचे वनक्षक सुरेश वनारसे, नर्सरी प्रमुख समाधान बागुल, वडगाव चे पोलीस पाटील संजय वाघोदे, नेहरू युवा केंद्र जळगांव चे रावेर ता. समन्व्यक आनंदा वाघोदे, पत्रकार विनायक जहुरे, नरवेल येथील मा. उपसरपंच पंकज तायडे, अरुण कोळी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नेचर हार्ट फाउंडेशन चे संचालक चेतन भालेराव, प्रशांत गाढे, मस्कावद येथील रविंद्र तायडे, वडगाव येथील सदस्य सचिन वाघोदे, अक्षय वाघोदे, विनायक वाघोदे, गोविंदा वाघोदे, चेतन वाघोदे, पंकज वाघोदे, निलेश वाघोदे, सुरेश वाघोदे, बलवाडी येथील भूषण ठाकरे, सावन ढीवरे, ऐनपूर येथील स्टेफीन कपले, कर्की येथील प्रशांतराज तायडे पिंप्रीभोजना येथील राहुल धुंदले, शरद धुंदले, यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत गाढे तर आभार चेतन भालेराव यांनी मानले.