Friday, August 7, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अटल भूजल योजनेने चौबारीकरांचा पाणी प्रश्न संपणार भू वैज्ञानिकांच्या चमुने गावाला दिली भेट

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/08/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
अटल भूजल योजनेने चौबारीकरांचा पाणी प्रश्न संपणार भू वैज्ञानिकांच्या चमुने गावाला दिली भेट

चौबारी ता. अमळनेर : (प्रतिनिधी) चौबारी गावाची अटल भूजल योजनेत निवड झाली असून गावाचा पाणी प्रश्न कायमस्वरुपी संपणार असल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे  वातावरण पसरले आहे. नुकतीच गावात अटल भूजल प्रकल्प जळगाव अंतर्गत भू वैज्ञानिक विक्रांत ठाकूर व त्यांच्या चमुने भेट देत गाव पातळीवर  बैठक घेऊन ग्रामस्थांना प्रकल्पाची सखोल माहिती दिली.

या चमुत ठाकूर यांच्या समवेत भूजल सर्वेक्षण आणि विभाग यंत्रणा अधिकारी संजय खलाणे, मेघराज देसले, दिपक करणकाळ आणि तुषार देवरे यांचा समावेश होता. उपस्थित अधिकाऱ्यांनी ग्राम बैठकीच्या माध्यमातून गावातील लोकांसोबत चर्चा करुन व अध्ययन पद्धतीचा वापर करुन गावाची सखोल माहिती जाणून घेतली.

सदर माहिती पाण्याचा ताळेबंद तयार करण्यासाठी तसेच लोक सहभागातून प्र्रकल्प यशस्वी होण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत सोमनाथ नाल्याबरोबरच गाव शिवारातील अन्य दोन नाल्यांचे खोलीकरण, रिचार्ज शाफ्ट, कोरडे झालेले बोअर, हातपंप, विहिर पुनर्भरण, सिंचन क्षेत्रात वाढ, शेततळ्यांना प्राधान्य असे विविध कामे मार्गी लागणार आहेत.

सदर प्रकल्प २०२४ पर्यंत चालणार असून आगामी काळात चौबारीकरांची पाण्याची समस्या कायमस्वरुपी संपणार असल्याने गावकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. बैठकीत ग्रामसेवक नितीन मराठे, सरपंच उषाबाई भिल, माजी सरपंच पितांबर कुंभकर्ण पाटील, नाना पाटील, सदस्य विजय पाटील, उल्केश पाटील, रवींद्र मोरे, धनराज पाटील, रावसाहेब पाटील, बापु पाटील, अंगणवाडी सेविका निर्मलाबाई पाटील, मिनाबाई पाटील आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येचे उपस्थित होते. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

नेचर हार्ट फॉउंडेशन ने पिंप्रीपंचम येथील 590 सी वनविभागात केले 500 वृक्षांचे वृक्षरोपण

Next Post

पैठण तालुक्यातील नागरिकांना मुबलक प्रमाणात पाणी मिळणार – पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

Next Post
पैठण तालुक्यातील नागरिकांना मुबलक प्रमाणात पाणी मिळणार – पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

पैठण तालुक्यातील नागरिकांना मुबलक प्रमाणात पाणी मिळणार – पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo