<
जळगांव(चेतन निंबोळकर)- दोन सभासदांचे सभासदत्व रद्द करण्याचा ठराव मंजूर झाल्याचे ठरावावर मतदान न घेता जाहीर करणारे लोकसहकार गटाचे संचालक यांच्याविषयी जिल्हाभरातील सभासदांमधून तीव्र नाराजीचा सूर उमटत असून आगामी काळात लवकरच ग.स.सोसायटीवर मूक मोर्चा काढला जाईल असे लोकशाही गटाचे किशोर पाटील कुंझरकर यांनी म्हटले असून प्रगती गटाचे अध्यक्ष रावसाहेब मांगो पाटील यांनी संचालक मंडळाच्या गैरकारभारावर वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या नंतर द्वारसभा घेत ताशेरे ओढले.व सर्व संचालकांना जेल वारी घडवून आणू असे जाहीर केलं. एकशे दहा वर्षाची वैभवशाली परंपरा असलेल्या ग.स. सोसायटी च्या इतिहासात एखाद्या सभासदाचे सभासदत्व रद्द करण्याच्या संदर्भात चा विषय संचालक मंडळाने पहिल्यांदा आणून सभासदांचे संविधानाने दिलेले अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेतले आहे.सदरील दोन्ही सभासदांची चुकल्या काही चुकलेले असते तर व्यक्तिगत यांच्यावर त्यांनी मानहानीचा दावा टाकायला पाहिजे होता. परंतु अशापद्धतीने सभासदत्व रद्द करणे म्हणजेच लोकशाही मूल्ये पायदळी तुडविणे आहे. सहकार गटातील विद्यमानसंचालक या विषयावर तटस्थ होते. सहकार गटातून फुटून तयार झालेल्या लोकसहकार गटातील विद्यमान चेअरमन संचालक यांनी सभागृहातील सर्व सभासद विषय क्रमांक बाराला कडाडून विरोध करत असताना फक्त संचालकांनी विषय मंजूर झाल्याचे जाहीर करून एक प्रकारे लोकशाहीचा खून केला आहे. सनदशीर मार्गाने या ठरावावर मतदान व्हायला हवे होते. सर्व सभासदांचे मतदान झाले असते तर संचालक मंडळाला त्यांची जागा दिसली असती .जिल्हा उपनिबंधक,निबंधक, राज्याचे सहकार आयुक्त, सहकार मंत्री सर्वांकडे आम्ही या विषयावर सभासदां मधून मतदानाची मागणी करणार हेतुपुरस्कर संचालक मंडळाने विषय क्रमांक बारा आणून त्यांच्या राजकीय सोयीसाठी दोन जणांचे सभासदत्व रद्द करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. प्रत्यक्षात सभासदांना विचारात घेतले गेले पाहिजे.किंवा या विषयावर पुन्हा विशेष सभा बोलवा.आगामी काळात संचालक मंडळाच्या चुकीच्या पद्धती चे विषय घेऊन आम्ही तालुकानिहाय सभासदांसमोर जाणार आहोत. आगामी काळात ग.स.सोसायटीवर शांततेच्या मार्गाने व कायदेशीर पद्धतीने अहिंसा मुकमोर्चे देखील काढण्यासंदर्भात सभासदांची भावना असूनआमचे नियोजन आहे. आगामी काळात राज्याचे मुख्यमंत्री सहकारमंत्री सर्व घटकांना अडतीस हजार सभासद असलेल्या ग.स.सोसायटीमध्ये नेमकं काय चाललंय याची पुराव्यासह सविस्तर माहिती देऊन बेकायदेशीर बाबी समोर आणले जातील. लोकमान्य लोकशाही प्रगती परिवर्तनगटातील आजी माजी संचालक व पदाधिकारी असतील सर्वांनीच सर्व विषय नामंजूर करण्यासाठी पुढाकार घेतला होता.लोकशाही गटाच्या वतीने सोसायटीची सर्वसाधारण सभा नेहमी शांततेत व्हावी यासाठी पुढाकार घेत असतो सातत्याने सर्वांना सय्यम शांततेचे फेसबुक व्हाट्सअप दैनिकातून आवाहन करून प्रत्यक्ष कृतीतून शांततेत मुद्दे मांडण्याची कडे आमचा कल असतो.एवढ्या मोठ्या सोसायटीमध्ये मोठ्या प्रमाणावर सभासद हिताकडे दुर्लक्ष केले जात आहे.विषय क्रमांक बारा रावसाहेब मांगो पाटील,योगेश सनर यांचे सभासदत्व रद्द करण्याचा लोकसहकार गटाने ठेवलेला प्रस्तावजिल्हाभरात कोणालाच पटलेला नसून त्यांचे सभासदत्व कायम राहील आणि आगामी काळात लोकसहकार गटाला याची किंमत चुकवावी लागेल यात तिळमात्र शंका नाही. असे यावेळी लोकशाही गटाचे किशोर पाटील कुंझरकर बोलताना म्हणाले.