<
मी शगुप्ता बानो मो.साबण मालेगाव शहरातील हिरापूर वस्तीत आम्ही आता राहतो. 2014 मध्ये आम्ही नजमाबाद नगर येथे राहत होतो. महेवी नगर कामगारांची वस्ती, छोटे-मोठे उद्योग व्यवसाय करणाऱ्यांची वस्ती. घरकाम करणे व घर सांभाळणे हे माझे काम. मी, पती व दोन मुले असे आमचे कुटुंब. माझे पती शिवणकाम करतात.
मुलांचे शिक्षण, दवाखाना, यामुळे बचत होत नव्हती. इच्छा खूप होती आपणही काही तरी करावे व संसारात मदत करावी. मग बचत गटाबाबत माहिती मिळाली. बचतीची महत्त्व समजले. आम्ही 10 महिलांनी शाने हिंद महिला बचतगटाची स्थापना, देना बँक, शाखा मालेगाव येथे केली.
आरोग्य, मुलांचे शिक्षण तसेच अडचणीच्या काळात गटाचे अंतर्गत कर्ज मिळू लागले, त्यामुळे कोणाकडे उसने मागण्याची गरज पडत नाही. आमच्या गटाला पहिले कर्ज एक लाख इतके मिळाले त्यातून आम्ही नवीन शिलाई मशीन खरेदी केली. व्यवसाय सुरु केला. दुसरे कर्ज मिळाले त्यात High speed मशीन खरेदी केली.
आमचा व्यवसाय चागल्या प्रकारे सुरु झाला. वेळोवेळी आम्हाला बचत गट संकल्पना, लेखा प्रशिक्षण मिळाले तसेच व्यवसाय प्रशिक्षणही मिळाले. त्यातूनच आम्हाला व्यवसाय वाढ करावी असे वाटले व आम्ही cmrc कडून गारमेंट व्यवसायासाठी SEDA अंतर्गत 1 लाख 80 हजार कर्ज घेतले. गारमेंट चा व्यवसाय सुरु केला. सर्वांच्या हाताला काम मिळाले. कर्जाचे हप्तेही नियमित सुरु होते.
पण कोरोना संकटामुळे सर्वच बंद झाले. अचानक झालेल्या LOKDOWN मुळे व्यवसाय बंद पडला. काहीही सुचत नव्हते. आम्हाला मालेगाव महानगरपालिकेच्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी 3000 मास्क तयार करण्याची ऑर्डर मिळाली. त्यामुळे कोरानाच्या काळातही आम्हाला काम मिळाले व आम्हाला रोजगार मिळाला.
इतकेच नाही तर कोरोनामुळे मास्क वापरणे आवश्यक असल्यामुळे आम्ही मास्क बनविणे सुरु ठेवले. चागल्या प्रतीचे मास्क असल्यामुळे आम्हाला ऑर्डरही मिळत गेल्या आजही आमचा व्यवसाय सुरु आहे. आमच्या गटामुळे आम्हाला कोरोना काळातही रोजगार मिळाला तसेच अनेक फेरी विक्रेत्यांनाही रोजगार मिळाला. आमच्या कडून अनेक फेरी विक्रेते मास्क घेऊन जातात. त्यामुळे मी ‘माविम’ ची खूप आभारी आहे.