<
जळगाव – (प्रतिनिधी) – राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या पूर्वसंध्येला 28 ऑगस्ट ला पिंपरी चिंचवड सायकलिस्ट ग्रुप ने Audax Club Parisien, फ्रान्स आणि Audax India Randonneurs मार्फत 300 km BRM (Brevets de Randonneurs Mondiaux) ब्रेवेट दी रन्डोन्नेउर सायकलिंग इव्हेंट चे आयोजन केले होते. या इव्हेंट मध्ये जळगाव सायकलिस्ट क्लब चे सदस्य आणि प्रसिद्ध pathologist डॉ. अनघा सुयोग चोपडे यांनी सहभाग नोंदवला.300 km BRM सायकलिंग साठी 20 तास चा कालावधी देण्यात आला होता.
पुण्याच्या वाकड येथून इव्हेंट ची सुरवात झाली तेथून बारामती, फलटण,लोणंद रोड, शिरवळ रोड,NH -4, कात्रज देहू रोड, कात्रज टनेल, वाकड हा 300 की. मी मार्ग ठरवून देण्यात आला होता. विरुद्ध दिशेने येणारी हवा आणि प्रखर सूर्याप्रकाश चा मारा सहन करीत डॉ. अनघा चोपडे यांनी यशस्वी रित्या लक्ष 13 तास 33 मीनीटात पार केले.
300 km BRM पुर्ण करणाऱ्या जळगांव जिल्ह्यातील पहिली महिला ठरल्या.
या इव्हेंट मध्ये पिंपरी च्या 30 सायकलिंस्ट्स नें सहभाग नोंदवलं आहे. Audax India Randonneurs तर्फे होमोलोगेशन ची प्रक्रिया पुर्ण करून फिनिशर्स मेडल आणि प्रशस्तीपत्रक देण्यात येते.
पुढील वाटचालीस डॉ. अनघा यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत.त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल जळगावात अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.