<
जामनेर(शांताराम झाल्टे)- पहुर शहरातील कायदा सुव्यवस्था व नागरीकांचे प्रश्न कसे सोडविता येइल याला सर्व प्रथम प्राधान्य माझ राहील यात सर्वांचेच सहकार्य अपेक्षीत आहे .कोणत्याही प्रकारचे गुन्हेगारी खपवून घेतल्या जाणार नाही .कायदा सुव्यवस्था शांतता शहरात राहण्यासाठी सहकार्य अपेक्षीत राहील. अश्या स्पष्ट भावना पोलिस निरीक्षक अरूण धनवडे यांनी बोलतांना व्यक्त केल्या.
पहुर पोलिस स्टेशनचा पदभार पोलीस निरीक्षक धनवडे साहेबांनी हाती घेतला असून सत्यमेव जयतेचे पत्रकार शांताराम झाल्टे यांनी पो.नि अरूण धनवडे यांची आज रोजी भेट घेऊन त्यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. पो.नि अरूण धनवडे हे कोल्हापूर येथील रहीवाशी आहेत. यावल ठिकाणी पो.नि अरुण धनवडे यांनी सेवा बजावली आहे. सर्व सामान्य नागरीकांचे प्रश्न समस्या कश्या सुटतील गोरगरीबांना न्याय कसा देता येइल याकडे माझ लक्ष राहणार आहे असे पोलीस निरीक्षक साहेबांनी आपले मनोगत व्यक्त केले.