<
जळगाव : प्राध्यापकांना वर्गात अध्यापन करण्यासाठी तीन दिवसीय कार्यशाळेतून नवीन आत्मविश्वास निर्माण झाला आहे. कार्यशाळा सातत्याने झाल्या पाहिजे. प्राध्यापकांना यामुळे मार्गदर्शन मिळते, असे प्रतिपादन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी केले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या वैद्यकीय शिक्षण विभागातर्फे तीन दिवसीय बेसिक कोर्स कार्यशाळा व नैतिकता व संवाद प्रशिक्षणचा बुधवार दि. १ सप्टेंबर रोजी समारोप झाला, त्यावेळी ते बोलत होते. मंचावर कार्यशाळेचे निरीक्षक वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय, नाशिकचे डॉ.राकेश पाटील, उप अधिष्ठाता डॉ. अरुण कसोटे, उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संगीता गावित, वैद्यकीय शिक्षण विभागाचे समन्वयक डॉ. किशोर इंगोले उपस्थित होते. सुरुवातीला डॉ. योगिता बावस्कर यांनी कार्यशाळा व प्रशिक्षणाचा गोषवारा स्पष्ट केला.
यावेळी निरीक्षक डॉ. राकेश पाटील म्हणाले की, प्रशिक्षणामध्ये ३ दिवस छान अनुभव आला. कार्यशाळेत अनेक नवीन व कल्पक विषय मांडले गेले. कार्यशाळेतून प्राध्यापकांना ऊर्जा मिळाली. विद्यार्थ्यांच्या अध्ययन पद्धती विषयी प्राध्यापकांना नवीन कल्पना मिळाल्या. अध्ययन पध्यतीत बदल कसे करावे, मांडणी कशी करावी त्याचे चांगले सादरीकरण झाले. शिबिरार्थीमधून डॉ.अक्षय सरोदे, डॉ. बाळासाहेब सुरोशे यांनी मनोगत व्यक्त केले.
सूत्रसंचालन डॉ.मोनिका युनाती यांनी तर आभार डॉ. किशोर इंगोले यांनी मानले. कार्यशाळेसाठी डॉ. योगिता बावस्कर, डॉ. योगिता सुलक्षणे, धनश्री पाटील, डॉ. मोनिका युनाती, डॉ. बाळासाहेब सुरोशे आदींसह कर्मचारी बापू पाटील, भरतसिंग पाटील, राकेश पिंपरकर यांनी परिश्रम घेतले.