<
जळगाव(प्रतिनिधी)- येथील भारत विकास परिषद, समर्पण संस्था व पर्यावरण शाळेच्या सयुक्त विदयमाने पर्यावरण पुरक श्रीगणेश मुर्ती कार्यशाळा उत्साहात पार पडली. या कार्यशाळेत १५० च्या वर बालक व महिला सहभागी झाल्या होत्या. कोल्हेनगर जवळ, वर्धमान हाईट समोर शिवकॉलनी मागील शारदाश्रम विदयालय येथे पार पडलेल्या या कार्यशाळेला भरघोस प्रतिसाद मिळाला. फाईन आर्टीस्ट उल्हास सुतार, कलाशिक्षीका योगीनी साळुंखे या कार्यशाळेत प्रशिक्षण दिली. यावेळी शाळू माती आयोजकांतर्फे पुरवण्यात आली होती. अनेक महिला व बालकांसाठी हा पहिलाच अनुभव असल्याचे या वेळी सहभागीनी सांगितले भारत विकास परिषद जळगाव, समर्पण संस्था व पर्यावरण शाळा यांच्या वतीने आज शाडू मातीचा गणपती बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.
1) गौरी तुषार तोतला:- माझा हा पहिलाच अनुभव होता, खुपच चागल्या प्रकारे शिकवण्यात आले, खुप खुप छान गणेश मूर्ती साकारण्यात आली, सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद
2)राधिका राजीव नारखेडे:- आजची कार्यशाळा खूप छान झाली. गणपती तयार करतांना मजा आली तसेच त्यातील अनेक बारकावे पण समजले.हा पहिलाच अनुभव पण खूप छान होता.शिवाय सगळ्यांबरोबर गणपती साकारतानां जो आनंद मिळाला तो अवर्णनीय होता.त्यासाठी, भा.वि.प. जळगाव शाखा,समर्पण संस्था व पर्यावरण शाळेचे मनापासून आभार
3)जान्हवी श्रीहर्ष खाडिलकर:- आजची कार्यशाळा खुप छान झाली. मातीत हात भरवले तेव्हा लहानपणाची आठवण झाली. सगळ्यांसोबत गणपती बनविण्याचा एक छान अनुभव होता. तसेच खुप बारकावे लक्षात आले. सर्व कला शिक्षकांनी खुप महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. शालेय शिक्षकांनी सुध्दा खुप मदत केली तसेच पर्यावरण शाळेने खुपच छान व्यवस्थापन केले होते.
4)ज्योती रवींद्र लड्ढा:- सर्व संयोजकांचे मन:पुर्वक आभार… भारत विकास परिषद जळगाव, समर्पण संस्था व पर्यावरण शाळा यांच्यावतीने आज शाडू मातीचा गणपती बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. माझा हा दुसरा अनुभव होता. मागील वर्षी पण मी घरी गणेश मूर्ती बनवली होती आज खूप चांगल्या प्रकारे शिकवण्यात आले, खुप खुप छान गणेश मूर्ती साकारण्यात आली, व सर्व मिळून गणेश मूर्ती बनविणे यात खूप आनंद वाटला.
5)सीमा प्रशांत महाजन:- भारत विकास परिषद जळगाव यांच्या वतीने शाडू मातीचे गणपती शिकवण्याचे प्रशिक्षण घेण्यात आले. आपल्या हाताने गणपती बनवणे हा एक खूपच छान अनुभव होता. खूप चांगल्या पद्धतीने शिकवण्यात आले. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. मी तीन वर्ष झाले घरीच गणपती बनवत आहे पण आज कला शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली व सर्वांसोबत गणपती बनवण्याचा छान अनुभव आला सुतार सरांचे सोपे टेक्निक शिकायला मिळाले पर्यावरण शाळेत येतील सर्व शिक्षकांनी चांगल्या प्रकारे व्यवस्थापन ठेवले होते. हसत खेळत वातावरणामध्ये गणपती बनवण्यात आनंद वाटला.
प्रसंगी, प्रकल्प प्रमुख चेतना नन्नवरे, भा.वि.प अध्यक्ष उज्वल चौधरी, सचिव उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार सदस्यांनी परीश्रम घेतले.