<
जळगाव -(प्रतिनिधी)- विवेकानंद प्रतिष्ठान संचालित काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल मध्ये पावसाचा प्रकल्प उत्साहात साजरा झाला. यामध्ये पाऊस कसा पडतो याची माहिती देण्यात आली.या नंतर पाऊस कसा पडतो यांचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. व्हिडिओ चित्रफित द्वारे मुलांना पावसाचे गाणे व पावसाचे महत्त्व दाखविण्यात आले.शिक्षकांनी रेखाटलेल्या जल चक्र या रांगोळी द्वारे विद्यार्थ्यांना पाऊस कसा पडतो ही माहिती देण्यात आली.या दिवशी बाहेर पाऊस पडत असल्याने मुलांनी पावसात भिजण्याचा आनंद लुटला. सदर कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक अमित सिंह भाटिया व समन्वयिका अनघा सागडे यांचे मार्गदर्शन लाभले. सदरं कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगिता गुरव यांनी केले. या कार्यक्रमास शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.