<
जळगाव(चेतन निंबोळकर)- येथील अजंठा विश्रामगृह येथे खान्देश युथ ऑर्गनायजेशन ची दुसरी मीटिंग संपन्न झाली. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली व पुढील काळात जे उपक्रम राबवायचे आहेत त्या संदर्भात चर्चा झाली. ग्राउंड लेव्हल वर उतरून काम करण्याचे ठरले कारण सध्याच्या परिस्थितीत संस्था भरपूर आहेत पण गाव पातळीवर काम करत नाही ते फक्त पेपरमध्ये असतात किंवा राजकीय असतात.
पुढील काळात जिल्ह्यातील विविध तालुक्यांना भेटी देऊन ग्राम विकास साधत गावांमधीलच तरुणांना नेतृत्वाची संधी देत स्वतःचा गावाचा विकास साधण्यासाठी सक्षम करत शासनच्या विविध उपाययोजना कशा प्रकारे गावासाठी आणू शकतो निती आयोगाचे SDG इम्प्लेमेंटेशन काय आहे याचे महत्त्व गाव पातळीवर सामान्य माणसाला कळाले पाहिजे. व यातून खान्देशातील गावांचा विकास कसा साधता येईल यासाठी तरुणांना सक्षम करणे हे काम पुढील काळात करण्याचे मीटिंग मध्ये ठरवण्यात आले. या मीटिंग मध्ये विविध तालुक्यातील आणि जळगाव, धुळे, नंदुरबार येथील खान्देश युथ ऑर्गनायजेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.