<
जामनेर(शांताराम झाल्टे)- येथील माया शेळके यांना 2021चा मानाचा आदर्श शिक्षक पुरस्कार जळगाव जिल्हा परिषदेच्या मार्फत जाहीर करण्यात आला. मायाताई शेळके जामनेर मधील रहिवाशी असुन खादगाव शाळेच्या उपशिक्षिका पदावर कार्यरत आहे. त्यांनी त्यांच्या जिवनातील संघर्षमय प्रवास करत संपूर्ण परिवाराची जवाबदारी सांभाळून मायाताई शेळके यांनी नोकरीच्या ठिकाणी कठोर परिश्रम करून आपल्या उत्तम कामगिरी ने आदर्श शिक्षक पुरस्कार मिळवला आहे.
जामनेर शहरातील मधुबन काँलनी भागातील रहिवासी असलेल्या उपशिक्षिका मायाताई शेळके धार्मिक सामाजिक कार्यात सुद्धा सहभागी होऊन मार्गदर्शन करत असतात. त्यांच्या परिश्रमाची सचोटीने केलेल्या नोकरी पदाची दखल घेताच त्यांना जाहीर पुरस्कार देण्यात आले. त्यांचे सर्वत्र जिल्ह्यात अभिनंदन होत असून शिक्षक मित्र परिवारां तर्फे कौतुक केले जात आहे. आज पर्यंत त्यांनी सेवा तांदूळवाडी, तोरनाळे, नांद्राहवेली, राजणी व खादगाव या गावी उपशिक्षिका या पदावर सेवा बजावली आहे. पूणे विद्यापीठ येथील इंद्रधनुष्य २०१०मध्ये टीम लीडर महणून सहभाग घेऊन उत्कृष्ट असे काम केलेले आहे. स्वच्छ शाळा व सुंदर शाळा, शालेय उपक्रमाचे आयोजन, शाळा मुल्याकन श्रेणी सुधार, लोकसहभागातून भौतीक सुविधांची निर्मिती, तंबाखू मुक्त शाळा, असे अनेक प्रकारचे उपक्रम राबविले आहे. त्यांना गायन, नृत्य, कलेचे आवड असून कोणत्याही क्षेत्रामध्ये ते सतत सहभागी असतात.
तसेच त्यांना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेच्या वतीने कै.आमदार वसंत बापट सन २००८ मध्ये शिक्षक गौरव पुरस्कार मिळाला तर श्री साई समर्थन फाऊंडेशन मार्फत सन २०१७ मध्ये महाराष्ट्र राज्य राज्यस्तरीय पुरस्कार, सन २०१५ व २०१६ मध्ये महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदे मार्फत गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळवला. नँशनल बिल्डर्स अवार्ड शाखा जळगाव तर्फे सन २०२० मध्ये आदर्श शिक्षिका पुरस्कार, राजनंदनीय बहुउद्देशीय संस्थेकडून सन २०२०मध्ये आदर्श शिक्षिका पुरस्कार देण्यात आला. अश्या अनेक पुरस्कारांनी माया शेळके यांना सन्मानित करण्यात आले आहे.