<
जळगांव(प्रतिनिधी)- कष्टाशिवाय मातीला आणि बैलाशिवाय शेतीला पर्याय नाही आणि म्हणून बैल पोळ्याचा सण, नसे बैलाचे आज जुंपण घालून झूल गळा, बांधून चाळ, त्यास सजवून आणावं मिरवून अशा या बैलाच्या अपार कष्टाचे आपण आपल्या संस्कृतीनुसार सदैव ऋणी असावे म्हणून केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालय एम.जे.कॉलेज जळगांव येथे बैल पोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी आपापल्या घरी राहून या आपल्या बळीराज्याच्या सख्याला पुरणपोळीचा नैवैद्य खाऊ घातला तर काहींनी आपल्या बैलांना छान सजवले. पालकांनी या चिमुकल्याना बैलपोळ्याचे महत्व सांगत त्यांना बैलाच्या अपार कष्टांची ओळख या वेळी करून दिली. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या मातीच्या बैलांची पूजा करून त्याचे आभार मानले. काहींनी बैलाच्या कविता सादर केल्या तर काहींनी बैलाच्या महती कथन केल्या. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने सणाचे महत्व पटवून दिले. कार्यक्रमाचे आयोजन उपशिक्षक योगेश भालेराव यांनी मुख्या. रेखा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केले तर यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.