<
जळगाव(प्रतिनिधी)- डॉ. उल्हास पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात हाऊ टू बिल्ड सेल्फ कॉन्फिडन्स यावर वेबीनार चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एजाज शेख यांनी आत्मविश्वासावर मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थ्यांना विविध उदाहरणे देऊन त्याचे महत्त्व पटवून दिले. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत होण्यास मदत झाली.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून एजाज शेख रिजनल प्रोजेक्ट ऑफिसर जीवन संजीवनी एचआरडी इन्स्टिट्यूट जळगाव हे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.आर सपकाळे उपस्थीत होते. डॉ.पी.आर सपकाळे यांनी शेख सर यांचे स्वागत केले. या वेबिनार प्रसंगी डॉ.के.पी.ढाके, वेबीनार आयोजक प्रा.निलेश भालतडक, सर्व प्राध्यापक, विद्यार्थी तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच आभार प्रदर्शन प्रा. निलेश भालतडक यांनी केले.