<
जामनेर(शांताराम झाल्टे)- ओझर, टाकरखेडा, हिंगने बु. शेळगांव, तळेगांव, टाकळी खु,लहासर, सामरोद , रामपूर, तोंडापूर इ. गावासह जामनेर तालुक्यात कपाशी, केळी, मका, सोयाबीन, तुर, ज्वारी, भुईमुंग, बाजारी यासह सर्व पिकांचे नुकसान झाले त्यामुळे गरिबांचे जास्तीत जास्त नुकसान झाले आहे. तर काहींच्या घरांची पत्रे उडालेली आहेत. जनावरे जखमी होऊन वाहून गेली,अतिवृष्टीमुळे हाहाकार माजला. या दरम्यान शेतकऱ्यांचे व नागरीकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
घटनास्थळी जाऊन तहसिलदार व प्रशासकीय अधिकारी , लोकप्रतिनिधी यांचे पाहणी करून गेले पण प्रत्यक्षात नागरीकांना व शेतकऱ्यांना कवडीचीही मदत मिळाली नाही. त्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांचे व लोकप्रतिनिधींचे हे पाहणी दौरे नसून तूम्ही पब्लिसिटी स्टंट करुण पुर ग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळत आहे.असे उदगार संभाजी ब्रिगेड नी मांडले आहेत. म्हणून पुरग्रस्त भागात पंचनाम्याचे कागदी घोडे न नाचवता जागेवर तात्काळ मदत दयावी प्रशासनाने या गंभीर घटनेची वेळीच दखल जर नाही घेतली तर संभाजी ब्रिगेड पुरग्रस्तांसाठी संभाजी ब्रिगेड स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा ईशारा संभाजी ब्रिगेड अध्यक्ष राम अपार यांनी दिला आहे.
यावेळी उपस्थित जिल्हाध्यक्ष प्रभाकर साळवे,रियाज पिंजारी, उमेश कचरे, संदीप पाटील, प्रवीन गावंडे, दिलीप साळुंके, विशाल पाटील, सागर लव्हाळे, परमेश्वर थाटे, निवृत्ती, कीरण पाटील, विजय काकडे, संजय काकूडे, धोंडू सोनवने, विनोद पाटील, दिपक ढोणी, योगेश पाटील, सतीष पाटील, आदी संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी हजर होते.