<
नाशिक(प्रतिनिधी)- माळी समाजाच्या वतीने गेली अनेक वर्षांपासून मोफत वधू-वर मेळाव्याचे आयोजन करत समाजात वेगळा आदर्श निर्माण केला त्यांच्या कार्याची पावती म्हणून त्यांना क्रांतिसूर्य सामाजिक संघटनेच्या वतीने जनभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे त्यानिमित्ताने माळी समाजाच्या वतीने श्रद्धा लॉन्स गणेशवाडी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले.
त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माळी समाज सेवा समितीचे अध्यक्ष विजय राऊत ,सामाजिक कार्यकर्ते शंतनू शिंदे,ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष उत्तमराव तांबे,संजय भडके यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी बोलतांना माळी समाज सेवा समितीचे अध्यक्ष विजय राऊत यांनी बोलतांना सामाजिक काम करतांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते वेळप्रसंगी लोकांच्या रोषाला देखील सामोरे जावे लागते अश्या परिस्थितीत सातत्याने काम करणाऱ्या लोकांचा सन्मान आणि प्रतिष्टा समाज निश्चितच करतो त्यामुळे नवीन कार्यकर्ते तयार करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.
उत्तमराव तांबे यांनी बोलतांना अडचणींवर मात करत कार्यकर्ते काम करत असतात त्यांचा सन्मान करून त्यांचा कार्याचा गौरव करणे गरजेचे आहे त्यामुळे इतर लोकांना काम करण्याचे प्रेरणा मिळते आणि चांगले काम पुढे होत राहत असल्याचे मत व्यक्त केले. सत्कारमूर्ती गिरीश बच्छाव यांनी बोलतांना पहिल्यांदा कामाला सुरवात सुरवात करतांना अनेक अडचणी आल्या पण त्या अडचणीवर मात करण्यासाठी ज्येष्ठ व माझ्या सहकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले त्यातून मार्ग काढत पुढे काम सुरु ठेवल्यामुळे आज हा सन्मान प्राप्त झाला असल्याचे मत व्यक्त केले.
त्यावेळी माळी समाज सेवा समितीचे अध्यक्ष विजय राऊत ,सामाजिक कार्यकर्ते शंतनू शिंदे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष उत्तमराव तांबे, संजय भडके, शंकराव काठे ,माधवराव बच्छाव, संजय भडके, रमेश गायकवाड, शंकराव पुंड, सचिन गायकवाड, सुनील थळकर, दौलतराव शेलार, अनिल गायवाड, शेखर भुजबळ, भारत क्षीरसागर, विजय शेळके, शाम कमोद, नंदकुमार येवलेकर, भास्कराव गांगुर्डे, नितीन कानडे, संजय पुंड, बाळासाहेब वाघ, अभिजीत राऊत, फाकीरव लोंढे यांच्यसह पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय भोसले यांनी केले.