जळगाव : विद्यावर्धिनी शिक्षण संस्था संचालित गणेश कॉलनी स्थित प्रगती बालवाडी शाळेत फॅन्सी ड्रेस स्पर्धा उत्साहात संपन्न झाली.लहान चिमुकल्यानी वेगवेगळा पोशाख परिधान करून सर्वांचे मन आकर्षित केले. या कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापिका ज्योती कुलकर्णी, शिक्षक वैशाली चौधरी, चंचल वाणी, सुनीता पाटील, अश्विनी सोले यांनी केले. यशस्वी विद्यार्थी अंगणवाडी विभागात प्रथम पल्लवी चोपडे,द्वितीय जान्हवी महाजन, शिशुवाडी विभागात प्रथम भैरवी कोळी, द्वितीय आराध्या पाटील, बालवाडी विभागात प्रथम मानस गचके, द्वितीय योशिता भालेराव. संस्थेचे चेअरमन प्रेमचंदजी ओसवाल व अध्यक्षा मंगला दुनाखे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला परीक्षकाचे काम कविता सोनार व शोभा फेगडे यांनी केले. सूत्रसंचालन दीप्ती मोडक तर आभार प्रदर्शन रजनी चौधरी यांनी केले.