<
जळगांव(धर्मेश पालवे):-शहरात सुरू असलेले रस्ते पुनर्निर्माण, सुशोभीकरनांचे काम सुरू आहे.मनपा कडून भर पावसात काम सुरू ठेवत दिलेले अभिवचन पाळत असल्याचा भास दाखवून काम केले असल्याचं समोर आलं आहे.शहरातील कोर्ट रस्ता ते ख्वाजामिया रोड पर्यंत रस्ते च्या सुशोभीकरन व गड्डे व रस्ता दुरुस्त केला गेला आहे, त्याच बरोबर या रस्त्यात दुभाजक बनवून वाहतूकिवर नियंत्रण ठेवण्या साठी प्रयत्न केला गेला आहे. मात्र दुभाजकावर दर १०० मीटर वर विद्युत खांब बसवले आहेत, हे खांब कोणत्याही मोजमाप व जनसुरक्षणासाठी च्या निकषावर रोवण्यात आले असल्याचं चित्र आहे.
डॉ.प्रदीप पाटील लहान मुलांच्या हॉस्पिटल समोर व नूतन मराठा कॉलेज समोरील बनवलेल्या रस्त्यात दुभाजकावर बसवलेले खांब आता विद्युत तार बसवण्या आधीच वाकले असून मनपा च्या प्रामाणिक कामा कडे बोट दाखवत आहे. स्थानिक लोकांशी बोलले असता सदर काम हे लवकरात लवकर आटोपण्याच्या घाईत या महत्वाच्या कामाकडे दुर्लक्ष करून मनपाने जनतेच्या सोयीकडे दुर्लक्ष केले असल्याचं सांगितलं. मनपा या कडे लक्ष देईल का? मक्तेदाराला या कामात वापरल्यात आलेल्या कच्च्या मालाची विचारपूस होईल का? किंवा मनपा आता काय उपाययोजना करेल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.