जामनेर(शांताराम झाल्टे)- तालुक्यातील ओझर, ओझर खुर्द, हिंगणे,लहासर, रामपूर, सामरोद या भागात चक्रीवादळ आणि पावसाने तडाखा दिला असल्याने येथील नागरिकांचे नुकसान झाले आहे. केळीच्या बागा, कपाशी, मका, तूर पूर्ण झोपून गेल्या आहेत. गावातील जवळपास १२५ घरावरची पत्रे उडाली आहेत. अन्नधान्य सर्व सामान्यांचे ओले होऊन प्रचंड नुकसान झाले आहे. नुकसान ग्रस्त पाऊस सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास सतत चालू असल्याने कुठलीही जिवितहानी झाली नाही.
या वादळी पावसामुळे नागरिकांनी कसेतरी स्वतःचे आपले प्राण वाचवले पण गुरे-ढोरे यांचे प्रचंड नुकसान झाले असल्याचे दिसून तसेच मोठी मोठी झाडे मुळासकट उखडली गेली. प्रसंगी नुकसान ग्रस्तांची भेट सुतार जनजागृती संस्थेचे जिल्हा उपाध्यक्ष गोपाल जाधव यांनी घेतली. या वेळेस तालुकाध्यक्ष समाधान मेतकर, जिल्हा उपाध्यक्ष वामन जंजाळकर, साहेबराव सांळुके उपस्थित होते.