<
जामनेर(शांताराम झाल्टे)– केकतनिंभोरे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत जिल्हा परिषदेच्या 15 वित्त आयोगातून गट्टू बसवण्याच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले असता कित्येक दिवसापासून गट्टू हा विषय प्रलंबित होता मात्र शिक्षण शालेय समिती केकतनिंभोरे यांच्या प्रयत्नांना खऱ्या अर्थाने यश आले.
जि.प शाळेच्या आवारात गट्टू बसवून विकासात्मक दृष्टीने व शाळेचा परिसर स्वच्छ व उत्कृष्ठ दिसावा यासाठी ची धडपड पाहता जिल्हा परिषदचे सदस्य विद्या खोडपे यांच्या जि.प. फंडातून गट्टू व फरशी चा निधी प्राप्त झाल्याने शाळेच्या विकासात्मक दृष्टिकोन यशस्वी झाला , यावेळी ग्रा प सरपंच अमोल पाटील व शिक्षण शालेय समिती अध्यक्ष यांनी जि.प.सदस्य विद्या खोडपे यांचे आभार व्यक्त केले. सदरील गट्टू चे उदघाटन जिल्हा परिषदेचे सदस्य विद्या खोडपे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी माजी जि. प. अध्यक्ष दिलीप खोडपे, न.पा.गटनेते डॉ. प्रशांत भोंडे, प.स. सदस्य अमर पाटील, गटशिक्षणाधिकारी श्री.सरोदे, प.स.गट शिक्षण विस्तार अधिकारी नरेंद्र चौधरी, सरपंच अमोल पाटील, शिक्षण शालेय समिती अध्यक्ष अभय हिवरे, मुख्याध्यापक सौ.भिरुड व समस्त ग्रा.प.सदस्य, शिक्षक गण व तसेच शिक्षण शालेय समिती सदस्य उपस्थित होते.