<
जळगाव(प्रतिनिधी)- भारत विकास परिषद जळगाव शाखेतर्फे शुक्रवार दि १७ सप्टेंबर रोजी दु. ४ वा ३० मि. महेश प्रगती मंंडळ महेश मार्ग रिंगरोड येथे रूग्ण साहीत्याचे लोकार्पण व कोविड योध्दा सन्मान सोहळ्याचे आयोजन केले आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून जळगावचे खा.उन्मेश पाटील, भारत विकास परिषद राष्ट्रीय वित्त सचिव संपतजी खुरदिया, राष्ट्रीय सचिव पश्चिम क्षेत्र सुधिर पाठक, देवगिरी प्रातांध्यक्ष गोपाल होलाणी, जळगाव शहराचे आ. राजूमामा भोळे, जिल्हा शल्यचिकीत्सक नागोजीराव चव्हाण, जळगाव जि. रा.स्व. संघचालक डॉ. निलेशजी पाटील, के.के.कँन्सचे अध्यक्ष उद्योजक रजनीकांतजी कोठारी इ. मान्यवर उपस्थीत राहणार आहे.
भारत विकास संचलित संपर्क फाऊंडेशन ही ना नफा ना तोटा या तत्वावर चालणारी नोेदणीकृत संस्था असून ३०/३५ सेवाव्रती रोज रूग्णांचे जिवन सुसहय करीत आहे. याचबरोबर जळगाव शहरातील अनेक डॉक्टर आणि कोविड काळातील विलगीकरण केंद्र व कोविड रूग्णालयात सेवा देणाऱ्या संपर्क फाउंडेशनच्या सेवाव्रतींचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
तरी या कार्यक्रमास उपस्थीत राहावे असे आवाहन भारत विकास परिषद जळगाव शाखाध्यक्ष उज्वल चौधरी, सेटलर तुषार तोतला आणि कार्यकारीणी मंडळाने केले आहे.