<
मुंबई – कोल्हापूर व सांगली येथे आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे खूप मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले होते। त्यामुळेच सामाजिक बांधिलकेचे भान ठेवून रिपरिवर्तन फाऊंडेशन, मुंबई आणि प्रवीण खेडकर मित्रपरिवार (नवी मुंबई) यांच्यामार्फत दिनांक १७ ऑगस्ट २०१९ रोजी कोल्हापूर आणि सांगली येथे शाहूवाडी,रेठरे, भिलवडी, बोरबन या गावातील पूरग्रस्तांना धान्य, साडी, टीशर्ट, सॅनिटरी पॅड, बिस्किटे, ब्लॅंकेट, पाणीची बाटली, घरगुती वस्तू, चहा पावडर, साखर, तांदूळ या प्रकारच्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले होते. प्रसंगी रिपरिवर्तन फाऊंडेशनचे उपाध्यक्ष सुशीलकुमार कमलाकर सावळे , प्रवीण खेडकर , अमोल देशमुख, अमोल पवार, आणि अन्य कार्यकरते उपस्तिथीत होते .