<
जळगांव(प्रतिनिधी)- सध्या राज्यात महिला, बालिकांवर अत्याचाराच्या घटना वाढलेल्या दिसून येत आहेत. समाजात महिला आणि बालिकांविषयी योग्य आणि सकारात्मक संदेश मिळावा या हेतूने जळगांव येथील आर.एल. हॉस्पिटल मध्ये काही दिवसांपूर्वी प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेने गोंडस अशा मुलीस जन्म दिला. आज आर.एल.हॉस्पिटल मध्ये रेड पुष्पवृष्टीचा वर्षाव करून सदर महिलेचा आणि मुलीचा यथोचित सन्मान करून घरी पाठविले.
या प्रसंगी महिलेच्या परिवाराने हॉस्पिटलचे आभार मानून समाधान व्यक्त केले. या वेळी हॉस्पिटल चे डॉक्टर, सिस्टर आणि सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.