<
जळगांव(प्रतिनिधी)- भारत सरकारच्या रेल्वेच्या खाजगीकरणाच्या धोरणांच्या विरोधात NFIR/CRMS च्या आवाहनावर CRMS JL-PC शाखेच्या वतीने JL आणि PC मध्ये गेट बैठक झाली. ज्यात रेल्वेच्या खाजगीकरणाला कडाडून विरोध झाला.
सचिव गणेश कुमार सिंहजी म्हणाले की, रेल्वेचे आधुनिकीकरणाच्या नावाखाली रेल्वेचे खासगीकरण केले जात आहे, त्याचे खाजगीकरण केले जाऊ नये. आउटसोर्सिंग बंद केले पाहिजे, रिक्त पदे भरली पाहिजेत, ही मागणी तीव्रतेने करण्यात आली असून कर्मचाऱ्यांच्या समस्या ऐकून घेण्यात आल्या. आजच्या गेट मीटिंग मध्ये जेएल स्टेशन मास्टर श्री.अग्रवाल, श्री.ठाकूर, शाखा अधिकारी रितेश श्रीवास्तव, विनय सिन्हा, व्ही.एम. पाटील, पीयूष माहेश्वरी, हेमराज मीना, गणेश पाटील, अविनाश कुमार, वाल्मिक बोरसे, योगेश चव्हाण, गजानन पाटील, चंद्रकांत सपकाळे आणि इतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.