<
जळगांव(प्रतिनिधी)- येथील पिंप्राळा भागात घराचे खोटे कागदपत्रे तयार करुन दाम्पत्याची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्धगुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी धरणगाव तालुक्यातील पाळधी बु. येथील पुजा हरीश झंवर यांनी दिलेल्या फिर्यादी वरून की, पिंप्राळा येथील गट क्रमांक 33 फ्लॅट क्रमांक 101 हे फिर्यादीच्या मालकीचे आहे. या फ्लॅटमध्ये सध्या दिनेश रामचंद्र तिवारी हे कुटुंबासह राहत आहे. 24 जुलै रोजी दिनेश तिवारी यांनी सदर फिर्यादी महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी सदर फिर्यादी महिलेला जमिनावर मुक्तता देण्यात आली होती. नंतर 20 रोजी दिनेश तिवारी यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.फिर्यादीत म्हटले आहे की, सदर फ्लॅट दिनेश तिवारी यांना घ्यायचा होता. त्याबाबत त्यांनी फिर्यादीशी संपर्क केला होता. या मिळकतीवर दिनेश तिवारी यांच्याशी काहीही एक सौदा केलेला नव्हता. तसेच कुठल्या वकिलांसमक्ष किंवा नोटरी दस्त केलेले नव्हते. फिर्यादीने घराचे कागदपत्रे कुणालाही न देता दिनेश तिवारी याने दस्तावेज तयार करुन साक्षीदार प्रकाश शामलाल कटारिया व अतुल अशोक खरे यांच्या समोर सह्या केलेल्या नाही. दिनेश तिवारी याने पूर्ण बनावट कागदपत्रे तयार केले आहे. करार नाम्यात लिहलेली रक्कम 41 लाख 51 हजार कधी ठरलेली नव्हती. तसेच कागदपत्रांवर लावण्यात आलेले फोटो फेसबुक वरून घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी संशयित आरोपी दिनेश रामचंद्र तिवारी व त्याची लीलाबाई दिनेश तिवारी (रा.वासूकमल नंदनवन अपार्टमेंट, मुक्ताईनगर, जळगांव), प्रकाश शामलाल कटारिया (बाबा स्वीट मार्ट, फुले मार्केट, जळगांव), अतुल अशोक खरे(जोशी पेठ, जळगांव), निलेश सुभाष पाटील(कुंभारीसिम ता. जामनेर), प्रेमसिंग विश्वसिंग पाटील(देवपिंप्री ता. जळगांव), बिरज इंदरचंद जैन(आदर्श नगर, जळगांव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.