<
जळगाव(प्रतिनिधी)- हृदयाला छिद्र असलेल्या एक चोवीस वर्षीय गभर्र्वतीला डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातील फिजिशियन, कार्डियोलॉजी, पेडियाट्रिक, पॅथॉलॉजी आणि स्त्रीरोग या पंचतज्ञांमुळे जिवनदान मिळाले असून प्रसृतीनंतर बाळ-बाळांतीण सुखरुप आहे.
गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात एकाच छताखाली सर्व प्रकारच्या आजारांचे तज्ञ डॉक्टर सेवा देत आहे. त्यामुळे अंत्यंत किचकट, गुंतागुंतीच्या, गंभीर आजारातून रुग्णांची यशस्वीपणे सुटका होत असून नातेवाईकांचा जीवही भांड्यात पडतो, अशी प्रचिती नुकतीच प्रसृती झालेली स्मिता (नाव बदललेले) सह तिच्या नातेवाईकांना डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात आली.जळगावनजीक असलेले नेरी-आव्हाना येथील रहिवासी असलेली २४ वर्षीय स्मिता हिची पहिली प्रसृतीही येथेच झाली होती. त्यानंतर दुसर्यांदा दिवस राहिल्यावरही त्यांनी डॉ.पाटील रुग्णालयातच प्रसृती करण्याचा निर्णय घेतला, फिजिशियन डॉ.बाचेवार, यांनी रक्त,लघवी व इतर तपासण्याचा सल्ला दिला. याचबरोबर छाती दुखत असल्याने भुलरोग तज्ञांनी हृदयविकार तज्ञ डॉ.प्रदिप देवकाते यांचा सल्ला घेण्यास सांगीतले.
तपासणी अंती गर्भवतीच्या हृदयाला छिद्र असल्याचे लक्षात आले.डॉ. देवकाते यांनी संमती दिली.त्यातच प्रसृतीची घटकाही जवळ आल्याने रुग्ण महिलेला ऑपरेशन थिएटरमध्ये घेत डॉ.जया शिंदे, डॉ.आकाश डोंगरवार यांनी प्रसृतीला सुरुवात केली,त्यांना भुलतज्ञ डॉ.शीतल ह्यांच्यासह ऑपरेशन थिएटरच्या स्टाफचे सहकार्य लाभले. प्रसृती गुंतागुंतीची होती, त्यामुळे जीवालाही धोका निर्माण झाला होता मात्र डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातील पंचतज्ञ डॉक्टरांच्या टिमला यश आले आणि बाळ-बाळांतीणीची सुखरुप सुटका झाली. चौकटकिचकट, गुंतागुंतीच्या प्रसृतीही डॉ.पाटील रुग्णालयात यशस्वीडॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील स्त्रीरोग विभाग हा अत्याधुनिक साधनांनी सुसज्ज आहे. एकाच वेळी ऑपरेशन थिएटरमध्ये पाच प्रसृती होण्याची व्यवस्था आहे.
स्त्रीरोग तज्ञांची टीम २४ तास सज्ज तर आहेच पण याचबरोबर रुग्णालयात फिजीशियन, कार्डियोलॉजिस्ट, पेडियाट्रिक तज्ञ, रेडिओलॉजिस्ट, पॅथॉलॉजी, ब्लड बँक हे सर्व अर्ध्या मिनीटाच्या अंतरावर उपलब्ध असल्याने रुग्ण कितीही गंंभीर असला तरी कमीत कमी वेळेत तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने रुग्णाची सुखरुप सुटका केली जाते. त्यामुळे अशा रुग्णांना तात्काळ रुग्णालयात आणावे, येथे तज्ञ डॉक्टर रुग्णसेवेसाठी सज्ज असल्याचे स्त्रीरोग विभाग प्रमुख डॉ.माया आर्विकर यांनी सांगितले.