Saturday, June 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘शरद शतम्’ आरोग्य कवच विमा योजना लागू करण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत  -मंत्री धनंजय मुंडे

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
22/09/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
बार्टीला ९१.५० कोटींचा निधी तातडीने वितरित; बार्टीच्या कोणत्याही योजनेला निधी कमी पडू दिला जाणार नाही -सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे

मुंबई(प्रतिनिधी)- राज्यातील ६५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांची वर्षातून किमान एकदा आरोग्य तपासणी करणे, त्यांना ‘शरद शतम्’ आरोग्य कवच विमा योजना लागू करणे या सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या महत्त्वाकांक्षी योजनेला कार्यान्वित करण्यासाठी श्री. मुंडे यांच्या निर्देशानुसार राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे.

राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे यांची या समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, एकात्मिक बाल विकास सेवा आयुक्त श्रीमती रुबल अग्रवाल, एन यु एच एमचे अतिरिक्त संचालक डॉ. सतीश पवार, डी एम ई आरचे उपसंचालक डॉ. अजय चांदनवाले, जे जे रुग्णालयातील डॉ. विनायक सावर्डेकर, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, ग्रामविकास विभागातील आस्थापना उपसचिव, तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाचे आस्थापना उपसचिव हे या समितीमध्ये सदस्य म्हणून काम पाहणार आहेत.

ज्येष्ठ नागरिकांकरिता आवश्यक असलेल्या विविध वैद्यकीय चाचण्यांबाबत शिफारशी करणे, या योजनेंतर्गत आशा वर्कर व अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण करणेबाबतच्या कार्यपद्धतीबाबत शिफारस करणे, या योजनेतील ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करण्यात आल्यानंतर त्याबाबतचा अहवाल संबंधीत ज्येष्ठ नागरिकांना प्राप्त होण्याबाबत व त्यात आजार आढळल्यास त्याचे निदान करणेबाबत तसेच आरोग्य विभागाच्या व इतर योजनेमध्ये अभिसरण करण्याची कार्यपद्धतीबाबत शिफारस करणे, इत्यादी बाबींसह शरद् शतम योजनेच्या एकूणच कार्यपद्धतीला निश्चित करण्यासाठी शिफारशी करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी या समितीवर नेमण्यात आली असून, समितीने ठराविक वेळेत याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश सामाजिक न्याय मंत्री ना. धनंजय मुंडे यांनी दिले आहेत.

Team Satymev Jayate

Previous Post

जात प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या अधिकारी कर्मचारी यांच्याबाबत निर्णय घेण्यासाठी नेमलेला अभ्यासगट मंत्रीमंडळाला अहवाल सादर करणार -अभ्यास गटाचे अध्यक्ष तथा मंत्री छगन भुजबळ

Next Post

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय -पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

Next Post
शहरातील नऊ रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यासाठी महानगरपालिकेने तातडीने ना हरकत प्रमाणपत्र द्यावे -पालकमंत्र्यांचे निर्देश

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय -पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo