<
जळगाव(प्रतिनिधी)- तालुक्यातील रायपूर गावासाठी दिनांक 23 रोजी जिल्हा परिषद शाळा रायपूर जळगाव येथे रायपूर ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्र नशिराबाद अंतर्गत उपकेंद्र कंडारी यांचे संयुक्त विद्यमानाने कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण शिबीर घेण्यात आले यावेळी 18 वर्षावरील सर्व वयोगटातील नागरीकांचे तसेच अपंग गरोदर, स्तनदामाता, यांनी लसीकरणाचा लाभ घेतला. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन अग्निहोत्री यांच्या मार्गदर्शना खाली लसीकरण शिबिर घेण्यात आले.
प्रथम ग्रामपंचायतीने आरोग्य टीमचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी सरपंच रजनी सपकाळे, उपसरपंच पुष्प परदेशी, सदस्य प्रवीण परदेशी, वसंत धनगर, उषाबाई परदेशी, संगीता इंगळे, शीतल परदेशी, ग्रामसेवक एन.जी. भोई पोलीस पाटील रामसिंग परदेशी यांच्या कडून आरोग्य विभाग टीमचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.शिबीर यशस्वीतेसाठी समुदायी आरोग्य अधिकारी डॉ.शिरीन पाटील, आरोग्य सेवक सुनील ढाके, आरोग्य सेविका आर. जी. पटेल, गतप्रवर्तक सुरेखा साळुंके, आशसेविका पूनम परदेशी, अंगणवाडी सेविका ममता परदेशी आदींनी मेहनत घेतली.
या टीम कडून लसीकरणा सोबतच कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना बाबत अंतर ठेवा, मास्क चा वापर करा, हात स्वच्छ करण्यासाठी साबण, सॅनिटायझर चा वापर करा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. याबाबतसुचना दिल्या जात होत्या. गावातील खाजगी डॉ.शांताराम भोईटे यांचेही सहकार्य लाभले.