<
जळगाव(प्रतिनिधी)- गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहूणे डॉ.ए.पी.चौधरी, अधिष्ठाता शैक्षणिक, संशोधन आणि विकास संचालक कृषी परीसर व अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.पी.आर. सपकाळे होते. व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ.कुशल ढाके, कार्यक्रम अधिकारी प्रा. एन डी.पाटील, डॉ.ललीत जावळे, डॉ.सागर चव्हाण, प्रा.एस.आर.सपकाळे, प्रा.माधुरी कावळे, प्रा.शितल पाटील, प्रा.सुमैया शेख आदी उपस्थित होते. याप्रसंगी प्राचार्य डॉ. सपकाळे यांनी विद्यार्थ्यांनी ज्ञान संपादन करताना समाज व राष्ट्राच्या उन्नतीसाठी प्रामाणिकपणे काम करण्याचे आवाहन केले. तसेच डॉ. चौधरी यांनी विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी व आत्मविश्वास अंगी बाळगल्यास जीवनात यशस्वी होता येते. माणुसकी धर्म, चांगले संस्कार समनिष्ठा व स्वच्छता या गुणांचा विकास करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना एक उत्तम माध्यम असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यानंतर महाविद्यालयाचे माजी स्वयंसेवक पौर्णिमा सपकाळे, सिमरन कौर, प्रसाद दुदुस्कर, वृषासेन बोचरे सागर पोखरकर यांनी आपले अनुभव, केलेले कार्य व त्यांना राष्ट्रीय सेवा योजनेतून शिकण्यास मिळालेल्या गोष्टी सांगितल्या. सूत्रसंचालन स्वयंसेवक ओंकार चव्हाण व आभार ज्ञानेश्वर भदाणे याने मानले.