<
जळगाव(प्रतिनिधी)- डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात १८ ते २३ सप्टेंबर या कालावधीत औषधशास्त्र विभागांतर्गत औषध देखरेख समितीतर्फे औषध देखरेख जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.
यात दररोज विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये औषधांचे देखरेख व नोंदीबाबत जनजागृती करण्यात आली.औषध देखरेख जनजागृती सप्ताहाचे उद्घाटन शनिवार, १८ सप्टेंबर रोजी गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, अधिष्ठाता डॉ.एन.एस.आर्विकर, डॉ.देवेंद्र चौधरी, डॉ.माया आर्विकर, डॉ.राहूल भावसार, डॉ.जयंत देशमुख, डॉ.सादूलवाड, डॉ.कैलास वाघ, डॉ.सारंग, डॉ.बापूराव बिटे यांच्या उपस्थीतीत करण्यात आले.
याप्रसंगी डॉ.उल्हास पाटील यांनी औषध देखरेख जनजागृती सप्ताहाबद्दल मार्गदर्शनपर संवाद साधला. अधिष्ठाता डॉ.एन.एस.आर्विकर यांनी कार्यक्रमाचे महत्व विशद केले. यावेळी डॉ.देवेंद्र चौधरी यांनी औषधी देखरेख, दक्षता व औषधींचे प्रतिकूल परिणामांबद्दल व्याख्यान दिले. तसेच डॉ.राहूल भावसार यांनी मान्यवरांचे स्वागत करत औषध देखरेख सप्ताहाचे स्वरुप सांगितले. यावेळी फिजीओथेरपी स्टाफ, नर्सिंग स्टाफ, होमिओपॅथी स्टाफ तसेच पदव्युत्तर विद्यार्थी डॉ.प्राजक्ता कालबांडे, डॉ.मुबिना शेख यांच्यासह महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थीत होते.
सप्ताहांतर्गत विविध महाविद्यालयात डॉ.बिटेंनी केले मार्गदर्शन सप्ताहातील दुसर्या दिवशी रविवार, १९ रोजी रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक यांना औषधांचे दुष्परिणाम ओळखणे व त्याची नोंद कशी करावी यासंदर्भात जनजागृतीबाबत डॉ.राहूल भावसार, डॉ.बापूराव बिटे यांनी संवाद साधत मार्गदर्शन केले. सोमवार, २० रोजी गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी, मंगळवार, २१ रोजी डॉ.उल्हास पाटील होमिओपॅथी महाविद्यालय आणि बुधवार, २२ रोजी डॉ.उल्हास पाटील भौतिकोपचार महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी औषध देखरेख , औषधांचे दुष्परिणाम, त्याची नोंद याबाबत सविस्तर माहिती डॉ.बापूराव बिटे यांनी दिली.
औषध देखरेख व जनजागृतीसाठी सादरीकरण पाठविणार या सप्ताहामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग व जनजागृतीसाठी भारतीय औषधकोष व औषध नियंत्रक केंद्रिय संस्था, भारत सरकार यांनी जनजागृतीपर विविध कार्यक्रम आयोजित केले. यावेळी डॉ.बापूराव बिटे यांनी निबंध व लिखाण, इंटर्न डॉ.अजय शिंदे यांनी पोस्टर प्रेझेंटेशन, रेसिडेंट डॉ.प्राजक्ता कालबांडे, डॉ.मुबिना शेख, डॉ.प्राकृत वैदेशेट्टी, अॅनिमेटेड व्हिडीओ जयश्री भुसारी आणि रोल प्लेचे सादरीकरण ओयल पाल, हेमा पार्थसारथी, नेहा सिंग, शिवानी चौधरी, मिरा सुरवसे यांनी देशपातळीवर औषध देखरेख व जनजागृती कार्यक्रमांसाठी आपले सादरीकरण पाठविणार आहे.