<
जळगाव(चेतन निंबोळकर)- येथील के.के.उर्दू गर्ल हायस्कूल व ज्यू कॉलेज मध्ये २९आँगस्ट रोजी हॉकी चे जादूगर मेजर ध्यानचंद यांचा जन्म दिन राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणुन साजरा करण्यात आला. या वेळी मुख्याध्यापिका शमीम बानो मलीक यांनी या दिनाचे महत्व सांगून मेजर ध्यानचंदांचे क्रिडा क्षेत्रात असलेले योगदानाबद्दल सविस्तर माहिती दिली. अकिल खान यांनी आपल्या आरोग्याबाबत माहिती दिली. यावेळी विद्यार्थिनींना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे “फिट इंडिया मूव्हमेंट” यावर आधारित भाषणाचे थेट प्रक्षेपण प्रोजेक्टरवर दाखविण्यात आले. इम्रानखान पठाण,तसेच क्रीडा विभागाच्या समीना शेख,कययुम शेख यांनी मादर्शन केले.शाह जाकिर,मझहरोदीन शेख,मुश्ताक भिसती, यांनी यशस्वीते साठी परिश्रम घेतले. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठया प्रमाणावर उपस्थित होते.