<
भडगाव हा जळगाव जिल्ह्यातील छोटा तालुका ,परंतु आजही जळगाव जिल्ह्याचे राजकारण किंवा राजकारणाचे वर्तुळ भडगाव तालुक्या शिवाय पूर्ण होत नाही जवळजवळ स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतरच्या काळात सुद्धा भडगाव तालुक्याचे जळगाव जिल्ह्यासाठी राजकारण, समाजकारण व शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान राहिलेले आहे.
यात भडगाव तालुक्यातील कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेचा सिंहाचा वाटा आहे. आज किसान शिक्षण संस्थेतील सर्व कर्मचारीच नव्हे संपूर्ण तालुका व जिल्हा मोठ्या दिमाखात संस्थेचे चेअरमन आदरणीय नानासाहेब प्रताप हरी पाटील यांचा 65 वा वाढदिवस मोठ्या दिमाखात साजरा करीत आहे. एक विनयशील, मितभाषी, बहुआयामी ,अजातशत्रू, खान्देश रत्न, ग्राम रत्न, ज्ञानयोगी, कर्मयोगी, लोकनायक, शिक्षण महर्षी, विकास रत्न, लोकमत आयकॉन, शिक्षण तपस्वी अशा विविध उपाध्या त्यांना विविध संस्थांमार्फत वेळोवेळी सन्मानपत्र व पुरस्कार स्वरूपात देऊन गौरवण्यात आलेले आहेत.
नानासाहेबांचा जन्म 28 सप्टेंबर 1956 रोजी आमडदे या गावात झाला प्राथमिक व अकरावी पर्यंतचे शिक्षण आमडदे येथे पूर्ण केल्यानंतर पी डी कोर्स भडगाव येथे पूर्ण केले, व त्यांनी त्यांची पदवी आपला आवडता विषय भूगोल घेऊन अमळनेर येथून मिळवली. लहानपणापासूनच एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती विटी दांडू ,विहिरीत पोहणे ,घोडेस्वारी करणे असे त्यांचे छंद होते जळगाव जिल्हा लोकल बोर्डाचे अध्यक्ष तालुक्याचे राजकारणातील भीष्म पितामह म्हणून ओळखले जाणारे कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील यांच्या पोटी जन्म घेतल्यामुळे त्यांनी त्यांचे छंद जोपासले व पूर्ण केले. पुढे कॉलेज जीवनात चांगले फुटबॉलपटू होते. अशात त्यांचा विवाह 18 जून 1980 रोजी साधनाताईंशी झाला व त्यांनी आपल्या वैवाहिक जीवनात पदार्पण केले. एक आदर्श शेतकऱ्याच्या कुटुंबात असताना. तरुणपणात ट्रॅक्टर चालवणे ,गडी माणसांबरोबर काम करणे, विहिरीत उतरून वेळप्रसंगी इलेक्ट्रिक मोटर दुरुस्त करणे ,आपल्या स्वतःच्या गुळाच्या गुऱ्हाळावर कामे करणे, सालदार गडीबर लक्ष ठेवून त्यांच्याकडून कामे करून घेणे असे त्यांचे तारुण्य जात होते
राजकारणात त्यांना विशेष रस होता समाजासाठी झटावे, समाजाची प्रगती व्हावी, या विचाराने ते कायम आग्रही होते. 1978 साली आपल्या मूळ गावी आमडदे तालुका भडगाव येथे त्यांनी वयाच्या 22व्या वर्षी शिवाजी युवक मंडळाची स्थापना केली. व तदनंतर तरुणां च्या मनात आपले स्थान पक्के करून 1981 साली पहिल्यांदा ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले.
बस एकदाचा त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि नंतर कधी मागे वळून पाहिलेच नाही कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील यांनी 1961 मध्ये किसान शिक्षण संस्थेची तालुक्यात मुहूर्तमेढ करून एक शैक्षणिक क्रांतीचे पाऊल पुढे टाकले आणि 1998 पर्यंत 30 वर्ष समर्थपणे यशस्वीरित्या संस्थेची धुरा सांभाळली वआपल्या वार्धक्यामुळे जेव्हा काम करणे शक्य होत नव्हते. तेव्हा त्यांनी या संस्थेची धुरा नानासाहेब प्रतापराव हरी पाटील यांच्याकडे दिली. शैक्षणिक क्षेत्रात भविष्याचा वेध घेत नवनवीन स्वप्ने उराशी बाळगत नानासाहेबांनी आपली प्रगतीची घोड दौड सुरू केली. आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून शैक्षणिक संस्थेची जबाबदारी नानासाहेबांनी समर्थपणे पेलली. आज संस्थेचा विस्तार पंधरा माध्यमिक शाळा, पाच जुनियर कॉलेज ,दोन प्राथमिक शाळा, सहा इंग्लिश मीडियम स्कूल, व्यवसायिक शिक्षणात एक अध्यापक विद्यालय, एक अपंग युनिट, किसान परिवार कृषी व कृषिपूरक सहकारी संस्था, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्र, सहकारी नोकरांची कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील पतसंस्था भडगाव, अण्णासाहेब अशोक हरी पाटील बहुउद्देशीय संस्था , कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील चॅरिटेबल ट्रस्ट भडगाव ,राष्ट्रीय बाल कामगार शाळा, कमल ताई पाटील बहुद्देशीय संस्था भडगाव व गेल्याच वर्षी वरिष्ठ कला महावि
द्यालय कोळगाव एवढा शैक्षणिक वटवृक्ष संस्थेचा वाढवला.
आपला शैक्षणिक संस्थेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व सर्जनशीलतेला वाव मिळावा ते सर्व गुण संपन्न व्हावेत म्हणून दरवर्षी कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील यांच्या पुण्यस्मरण सप्ताहाचे आयोजन 23 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत केले जाते या सप्ताह सोहळा च्या दरम्यान संस्थेतील प्रत्येक शाखा. विविध मान्यवरांची व्याख्याने, विद्यार्थ्यांसाठी मैदानी खेळ तसेच रंगमंचावरील स्पर्धा आयोजित केले जातात व त्यांना योग्य ते बक्षिसे देऊन प्रोत्साहित केले जाते/ संपूर्ण जिल्ह्यात एवढा दिमाखदार सोहळा कदाचित फक्त याच संस्थेत आयोजित केला जात असेल असे वाटते.
त्यांची कार्यशैली व दर्जेदार आचरण, उदंड संयम, सातत्य पूर्ण परिश्रम, अखंड प्रसन्नता आणि प्रचंड आशावाद म्हणजेच ‘झिजला तरी चालेल पण गंजू नका’ या तत्वामुळे समाजातील विविध माध्यमांनी त्यांना विविध सन्मान पत्रे व गौरवचिन्ह देऊन त्यांचा गौरव केला यात भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते सन 2014 रोजी त्यांना ‘लोकमत आयकॉन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते सन दोन हजार सतरा मध्ये त्यांना ‘शिक्षण तपस्वी’ ही पदवी बहाल करून सन्मानित करण्यात आले महाराष्ट्रातील लोकमत वृत्तपत्र द्वारे खासदार विजय दर्डा यांच्या हस्ते ‘खान्देश रत्न’ तर आचारी ज सं पवार ज्ञानेश्वरी वांग्मय प्रतिष्ठान नाशिक यांच्या वतीने ‘शिक्षण महर्षी’ प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या हस्ते ‘विकास रत्न’, कृषी विभागात व शेतकऱ्यांविषयी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल ते पाचोरा भडगाव बाजार समितीचे सभापती असताना त्यांनी आपल्या कार्याचा ठसा पूर्ण जळगाव जिल्ह्यात उमटविला त्याकरिता ‘ग्राम विकास’ व जलसंधारण विभाग महाराष्ट्र शासनामार्फत त्यांना मानाने ‘सन्मानपत्र’ देण्यात आले.
आमडदे तालुका भडगाव गावातील विविध संस्थांवर गेल्या पन्नास वर्षापासून तर आज तागायत त्यांचे निर्विवाद वर्चस्व राहिलेले आहे. एवढेच नाही तर जिल्हा परिषद जळगाव, जिल्हा नियोजन समिती, जळगाव तालुका समन्वय व पुनर्विलोकन समिती भडगाव, जळगाव जिल्हा स्काऊट अँड गाईड जळगाव, जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघ जळगाव यांचे संचालक पद सुद्धा त्यांनी भूषविले पाचोरा भडगाव कृषी उत्पन्न बाजार समिती यांचे सभापती म्हणून त्यांनी 2010 ते पंधरा काम पाहिले एवढेच नाही आपल्या गावा बरोबर इतर गावांचा सुद्धा तळापासून विकास व प्रगती व्हावी यासाठी त्यांनी भडगाव तालुका सरपंच संघटना स्थापन करून स्वतः संस्थापक अध्यक्ष झाले. व आपल्या कार्य शैलीतून लोकांना सरपंचांना प्रेरणा देण्याचे काम नेहमीच करत राहिले.
असं म्हणतात ‘उठायला शिकावं लागत नाही पण अश्रू पुसायला मात्र शिकावं लागतं’ अश्रूंची किंमत ठराविक मर्यादेपर्यंत असते सावरण्याची उभारी घेण्याच्या क्षणाची चाहूल लागली की अश्रू कवडी मोलाचे ठरतात.आपल्या जीवनात नानासाहेबांनी वडील,आई, पत्नी, भाऊ, वहिनी, बहिण, मेहुणे असे बरेच काहीनाती काळाने त्यांच्यापासून हीरावून नेली. त्यांच्या मृत्यूने खचून न जाता संयमाने दुःखाश्रू गाळून नानासाहेबांनी त्यांचे कार्य सुरूच ठेवले. दिनांक 24 12 2016 रोजी ज्यावेळेस त्यांची अर्धांगिनी साधनाताई त्यांना सोडून गेली. तेव्हा एकुलती एक मुलगी डॉक्टर पुनम ताई व ते दुःख सागरात बुडून गेले. सारेच काही संपले असे वाटत होते.परंतु त्यांनी बघितले एवढा मोठा परिवार व आपल्यावर अवलंबून असलेले घटकांचा विचार करून डॉक्टर पुनम यांना सांगितले की ‘पर्वताएवढे उंची गाठायची असेल तर पर्वताएवढे दुःख पचवण्याची शक्ती सुद्धा आपल्यात असली पाहिजे’.
त्यांचे अध्यात्मिक कार्य व आवड वाखाणण्याजोगी आहे दरवर्षी किर्तनाचा, सत्संगाचा कार्यक्रमसाजरा करताना प्रत्येक कार्याला अध्यात्माची जोड देत त्यांनी परिसरातल्या बऱ्याचश्या मंदिरांना व संस्थानांना मोठ्या देणग्या दिल्या आहेत. एवढेच नाही रंजल्या गांजल्या यांचे दुःख पुसत असताना जो कोणी त्यांच्या पायरीवर जाईल त्याचे दुःख निश्चितच नानासाहेबांनी पुसले आहे. मग यात प्रमुखा विना उघडा पडलेला परिवारास. एखादी शहीद झालेल्या सैनिकाचा परिवारास. प्रत्येकाच्या पाठीवर मायेची थाप ते ठेवल्या बिगर राहत नाही.
गेल्या दोन वर्षापासून कोरोना सारखा महाभयंकर राक्षस पूर्ण जगात थैमान घातलेले आहे. कोणत्या ही व्यक्तीचे कुटुंब कोरोना ची आस लागल्याशिवाय वाचलेले नाही. यातच तालुक्यातील बऱ्याच जणांना कोरोना नंतरच्या काळात म्युकर मयकोसिस चा त्रास झाला. या रोगाची उपचार पद्धती अतिशय खर्चीक असल्याने बऱ्याच जणांना त्यांनी आर्थिक हातभार दिला.
कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेचे आदरणीय चेअरमन नानासाहेब प्रतापराव हरी पाटील यांच्याविषयी दोन शब्द मांडणे कठीणच आहे.
कारण असे क्षेत्र नाही की जिथे त्यांची छाप नाही म्हणून त्या ऋणा पोटी संस्थेतील सर्व शाखांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी त्यांच्या वाढदिवसानिमित्त नेहमीच काहीना काही समाजासाठी, समाजाच्या उत्थानासाठी काही तरी करीत असतात. मागील काळात संस्थेने पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये ,दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांसाठी, शहीद सैनिकांच्या कुटुंबासाठी, भरीव आर्थिक योगदान दिलेले आहे यावर्षी संस्था गर्वाने अभिमानाने प्रगतीपथावर मार्गक्रमण करताना. परिसरातील ज्या कुटुंबाचे प्रमुख कोरोना रुपी राक्षसाने हिरावून नेले आहेत. त्या कुटुंबाला, त्यांच्या पाल्यांना आर्थिक मदत येत्या 30 तारखेला भव्य दिव्य अशा कार्यक्रमात आमडदे येथेआदरणीय पालक मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते व विविध मान्यवर यांच्या उपस्थितीत देणार आहे.
संस्थेत बऱ्याच जणांनी विद्यावाचस्पती पदवी मिळवली आहे तसेच बरेच जण सामाजिक राजकीय क्षेत्रात मोठमोठ्या पदांवर कार्य करीत आहेत. अशा प्रत्यूष यांचे नानासाहेब मार्गदर्शक व प्रेरणास्रोत आहेत म्हणून त्यांना प्रत्यूशांचे शिलेदार म्हटलेले वावगे ठरणार नाही या भोसले कुलावंतस आई तुळजाभवानी दीर्घायुष्य अविरत प्रेरणा देवो त्यांच्या कार्यासाठी स्वाध्याय परिवाराचे गीत निश्चितच आठवते
देह झाला चंदनाचा नेत्र यज्ञांची धुनी
‘व्हा तुम्ही नानासाहेब ! शतायु ‘ये ध्वनी गगनातुनी
शब्दांकन
नितीन एन पाटील , गिरड कार्य संपादक, किसान नियतकालिक