<
जळगांव(प्रतिनिधी)– प्रगती माध्यमिक शाळेत नाविन्य पूर्ण उपक्रम राबविला जातात. त्यापैकी चला खेळू या दोन शब्दाशी हा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमात पाठ्यपुस्कातील अध्ययन अध्यापन पद्धतीत पाठात एका अर्थाचे अनेक शब्द येत असतात. त्या अर्थाचे शब्द विद्यार्थ्याच्या लक्षात राहीले पाहिजे म्हणून मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाने उपक्रम राबविण्यात आला.
शैक्षणिक उपक्रमातून सामाजिक व धार्मिक सहभागातून दैनंदिन जीवनात अनेक गोष्टींमुळे आपला संपर्क अनेकांशी येत असतो.या कारणाने शैक्षणिक उपक्रमातून विद्यार्थ्याना भाषा विषयाचा उपक्रम देण्यात आला आणि यशस्वी झाला. विद्यार्थ्यांचा शब्दभांडार, अभ्यासाची गोडी, आकलन क्षमता, लक्षात घेता मुख्याध्यापिका मनीषा पाटील यांनी अनमोल मार्गदर्शन केले. या उपक्रमाचे कौतुक विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रेमचंद ओसवाल यांनी केले.
या उपक्रमाच्या यशस्वितेकरिता सर्व भाषा शिक्षक, व अन्य शिक्षकानी भाग घेतला.दीपक बारी,अनिल वाघ,सुभाष शिरसाठ, कीर्ति तळेले, सुवर्णा पाटील, हर्षदा पाटील, प्रियंका वाणी इत्यादी शिक्षकांनी उपक्रम यशस्वितेकरिता अनमोल सहकार्य केले.