<
जळगाव(प्रतिनिधी)- ऑगस्ट २०२१ पासून ते आतापावेतो दर शनिवारी वा रविवारी होत असलेल्या बीआरएमद्वारे आयोजित सायकलिंग इव्हेंटमध्ये पॅथॉलॉजिस्ट डॉ.अनघा चोपडे ह्या आपले संपूर्ण लक्ष केंद्रित करत निर्धारित वेळेेपेक्षा कमी वेळेत उपक्रम पूर्ण करीत आहे, नुकतेच शनिवार, २५ सप्टेंबर रोजी वाशिम येथे आयोजित BRM ४०० किलोमीटर अंतर २६ तास २२ मिनीटं आणि १४ सेंकदात पूर्ण करत सुपर रॅन्डोनीअर ठरल्यात.
जळगाव शहरातून असा विक्रम करणार्या त्या एकमेव आणि पहिल्या महिला सायकलिस्ट ठरल्यात.ऑडेक्स क्लब पॅरेशियनच्या माध्यमातून संपूर्ण भारतात बीआरएम सीरीज घेण्यात येतात. त्यात महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातून BRM(Brevets de Randonneurs Mondiaux ) Series पूर्ण करणार्या पहिल्या महिला सायकलिस्ट म्हणून डॉ.अनघा चोपडे ह्य ठरल्या आहेत. शनिवार, २५ सप्टेंबर रोजी वाशिम येथे आयोजित BRM ४०० या इव्हेंटसाठी २७ तास इतका वेळ देण्यात आला होता. डॉ.अनघा यांनी तब्बल २० तास १२ मिनीटे ०५ सेंकद सायकल चालविली असून एकुणच संपूर्ण अंतर पार करण्यात त्यांना २६तास २२ मिनिट, १४ सेकंदाचा कालावधी लागला.
डॉ.अनघा चोपडे यांनी त्यांची इठच सिरिस पुर्ण केली असून जळगांव मधील पहिली महिला SR ( Super Randonneur ) बनण्याचा मान पटकवला आहे. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. डॉ.अनघा ह्यांना न्यूट्रीशन अॅण्ड हायड्रेशनसाठी डॉ.सुयोग चोपडे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.आवाहानात्मक सिरीज पूर्ण करण्याचा मान सर्व BRM events पैकी BRM ४०० ही सर्वात जास्त आवाहानात्मक होती असे डॉ.अनघा चोपडे यांनी सांगितले. ही आवाहानत्मक सिरिस पुर्ण करून डॉ. अनघा यांची अंतराराष्ट्रीय दर्जाच्या सायक्लीस्ट्स होण्याचा मान वयाच्या अवघ्या ३७ व्या वर्षी मिळवला.
त्यांच्या या यशाबद्दल महापौर जयश्री महाजन, शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे यांनी डॉ अनघा यांच्या निवास स्थानी सदिच्छा भेट देऊन शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. सत्काराचा स्विकार करत युवा पिढी साठी फिटनेस करिता जनजागृती करणार असल्याचे डॉ.चोपडे म्हणाल्यात.स्वप्नं एकाच टप्प्यात पूर्णदरवर्षी बीआरएमद्वारे विविध अंतर पार करण्याचे उपक्रम राबविले जातात, या उपक्रमासाठी डॉ.अनघा ह्यांनी गेल्या वर्षीपासून प्रॅक्टीसला सुरुवात केली. यंदाच्यावर्षी १४ ऑगस्ट रोजी औरंगाबाद येथे २०० किलोमीटर, पिंप्री चिंचवड पुणे येथे २८ ऑगस्ट रोजी ३०० किलोमीटर, १७ सप्टेंबर रोजी नांदेड येथे ६०० किमी तर २५ ऑगस्ट रोजी तब्बल ४०० किलोमीटर अंतर वाशिम येथे करुन बीआरएम सीरीज पूर्ण केली. दोन महिन्यात एका सीरीजमधील चार टप्पे काही दिवसांच्या अंतराने पूर्ण करण्याचे स्वप्नं डॉ.अनघा चोपडे ह्यांनी पूर्ण केले.