Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

डॉ.अनघा चोपडे ठरल्यात सुपर रॅन्डोनीअर; सायकलवर २६ तासात पार केले ४०० किलोमीटर अंतर

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
29/09/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
डॉ.अनघा चोपडे ठरल्यात सुपर रॅन्डोनीअर; सायकलवर २६ तासात पार केले ४०० किलोमीटर अंतर

जळगाव(प्रतिनिधी)- ऑगस्ट २०२१ पासून ते आतापावेतो दर शनिवारी वा रविवारी होत असलेल्या बीआरएमद्वारे आयोजित सायकलिंग इव्हेंटमध्ये पॅथॉलॉजिस्ट डॉ.अनघा चोपडे ह्या आपले संपूर्ण लक्ष केंद्रित करत निर्धारित वेळेेपेक्षा कमी वेळेत उपक्रम पूर्ण करीत आहे, नुकतेच शनिवार, २५ सप्टेंबर रोजी वाशिम येथे आयोजित BRM ४०० किलोमीटर अंतर २६ तास २२ मिनीटं आणि १४ सेंकदात पूर्ण करत सुपर रॅन्डोनीअर ठरल्यात.

जळगाव शहरातून असा विक्रम करणार्‍या त्या एकमेव आणि पहिल्या महिला सायकलिस्ट ठरल्यात.ऑडेक्स क्‍लब पॅरेशियनच्या माध्यमातून संपूर्ण भारतात बीआरएम सीरीज घेण्यात येतात. त्यात महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातून BRM(Brevets de Randonneurs Mondiaux ) Series पूर्ण करणार्‍या पहिल्या महिला सायकलिस्ट म्हणून डॉ.अनघा चोपडे ह्य ठरल्या आहेत. शनिवार, २५ सप्टेंबर रोजी वाशिम येथे आयोजित BRM ४०० या इव्हेंटसाठी २७ तास इतका वेळ देण्यात आला होता. डॉ.अनघा यांनी तब्बल २० तास १२ मिनीटे ०५ सेंकद सायकल चालविली असून एकुणच संपूर्ण अंतर पार करण्यात त्यांना २६तास २२ मिनिट, १४ सेकंदाचा कालावधी लागला.

डॉ.अनघा चोपडे यांनी त्यांची इठच सिरिस पुर्ण केली असून जळगांव मधील पहिली महिला SR ( Super Randonneur ) बनण्याचा मान पटकवला आहे. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. डॉ.अनघा ह्यांना न्यूट्रीशन अ‍ॅण्ड हायड्रेशनसाठी डॉ.सुयोग चोपडे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.आवाहानात्मक सिरीज पूर्ण करण्याचा मान सर्व BRM events पैकी BRM ४०० ही सर्वात जास्त आवाहानात्मक होती असे डॉ.अनघा चोपडे यांनी सांगितले. ही आवाहानत्मक सिरिस पुर्ण करून डॉ. अनघा यांची अंतराराष्ट्रीय दर्जाच्या सायक्लीस्ट्स होण्याचा मान वयाच्या अवघ्या ३७ व्या वर्षी मिळवला.

त्यांच्या या यशाबद्दल महापौर जयश्री महाजन, शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे यांनी डॉ अनघा यांच्या निवास स्थानी सदिच्छा भेट देऊन शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. सत्काराचा स्विकार करत युवा पिढी साठी फिटनेस करिता जनजागृती करणार असल्याचे डॉ.चोपडे म्हणाल्यात.स्वप्नं एकाच टप्प्यात पूर्णदरवर्षी बीआरएमद्वारे विविध अंतर पार करण्याचे उपक्रम राबविले जातात, या उपक्रमासाठी डॉ.अनघा ह्यांनी गेल्या वर्षीपासून प्रॅक्टीसला सुरुवात केली. यंदाच्यावर्षी १४ ऑगस्ट रोजी औरंगाबाद येथे २०० किलोमीटर, पिंप्री चिंचवड पुणे येथे २८ ऑगस्ट रोजी ३०० किलोमीटर, १७ सप्टेंबर रोजी नांदेड येथे ६०० किमी तर २५ ऑगस्ट रोजी तब्बल ४०० किलोमीटर अंतर वाशिम येथे करुन बीआरएम सीरीज पूर्ण केली. दोन महिन्यात एका सीरीजमधील चार टप्पे काही दिवसांच्या अंतराने पूर्ण करण्याचे स्वप्नं डॉ.अनघा चोपडे ह्यांनी पूर्ण केले.

Team Satymev Jayate

Previous Post

शेतकऱ्यांना आपत्तीतून बाहेर काढणार; तातडीची सर्वतोपरी मदत पोहचविण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

Next Post

अतिवृष्टीमुळे सीईटी परीक्षा देऊ शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांना पुन्हा संधी -उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

Next Post
राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांचे काम सर्वांसाठी आदर्श -उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत

अतिवृष्टीमुळे सीईटी परीक्षा देऊ शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांना पुन्हा संधी -उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo