<
जळगाव(प्रतिनिधी)- एका एकोणावीस वर्षीय तरुणाचा डावा हात अचानक सुजल्याने त्याला हालचाल करणेही कठीण झाले होते. तपासणीअंती तरुणाला खांद्याच्या क्षयरोगाचा विळखा झाल्याचे अस्थिरोग तज्ञांच्या लक्षात आले, त्या तरुणाची कुठलीही शस्त्रक्रिया न करता केवळ औषधोपचाराच्या बळावरच रुग्णाचा खांद्याचा क्षयरोग हा दीड वर्षाच्या ट्रिटमेंटने पूर्णत: बरा करण्यात तज्ञांना यश आले.
मध्यप्रदेशातील हरदा या गावातील रहिवासी असलेला एकोणावीस वर्षीय इरफान कासार ह्या तरुणाच्या डाव्या हाताला एके दिवशी अचानक सूज आली. सूज एवढी वाढली की त्याला हाताची हालचाल करणेही कठीण झाले तसेच खुप वेदनाही त्याला होत्या. गावातील डॉक्टरांच्या सल्ल्याने बर्फानेही हात शेकून काढला मात्र उपयोग झाला नाही. एका नातलगाने डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला आणि इरफानला घेऊन त्याचा भाऊ गुलाम मुस्तफा रुग्णालयात आला. डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातील अस्थिरोग तज्ञ डॉ.दिपक अग्रवाल यांनी रुग्णाची हिस्ट्री जाणून घेतली आणि तात्काळ एमआरआय, एक्स रे तसेच काही रक्ताच्या चाचण्याही करुन घेण्याचा सल्ला दिला.
रिपोर्टनुसार रुग्णाला खांद्याचा क्षयरोग झाल्याचे निष्पन्न झाले.यावेळी डॉ.दिपक अग्रवाल यांनी रुग्णाला आजार आणि त्याला बरा होण्यासाठी लागणारा कालावधीची माहिती दिली, रुग्णाने देखील मी संपूर्ण औषधोपचार घेईल असे सांगितले. सर्वप्रथम रुग्णाला पोषक आहार, फळे खाण्याचा सल्ला देण्यात आला, ज्यामुळे रुग्णाची प्रतिकारशक्ती वाढेल. त्यानंतर दर महिन्याला औषधी आणि त्याची मात्रा बदलवून देण्यात आली. पहिल्या तीन महिन्यातच रुग्णाला आराम पडला, मात्र मध्येच ट्रिटमेंट सोडायची नाही, असे डॉक्टरांनी बजावून सांगितले होते.
त्यानुसार तब्बल दीड वर्ष कालावधीची ट्रिटमेंट पूर्ण केली. ट्रिटमेंट पूर्ण झाल्यानंतर २९ सप्टेंबर रोजी रुग्ण फॉलोअपसाठी रुग्णालयात आला असता त्याचा खांद्याचा क्षयरोग पूर्णत: बरा झाला होता व रुग्ण आनंदाने घरी परतला. उपचारादरम्यान रुग्णाला वेळोवेळी डॉ.दिपक अग्रवाल, डॉ.राहूल, डॉ.परिक्षीत, डॉ.सुनित वेलणकर यांनी सहकार्य केले.सातत्य ठेवून पुर्ण उपचार घेतल्यास विनाशस्त्रक्रियेने देखिल कर्करोग बरा होतोकुठल्याही आजारातून बरे होण्यासाठी संपूर्ण उपचार घेणे आवश्यक असते. क्षयरोग ह्या आजारातून देखील बरे होता येते मात्र रुग्णाने ट्रिटमेंट पूर्ण केली पाहिजे. छाती आणि हाडे असे दोन प्रकारचे टिबी असतात. छातीचा क्षयरोग बरा होण्यासाठी साधारण : ६ महिन्याचा कालावधी तर हाडांचा टिबी बरा होण्यसाठी दिड वर्षाचा कालावधी लागतो.