<
जळगाव-(प्रतिनिधी) – भारतीय हॉकीचे मानांकित खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या २९ ऑगस्ट या जयंती दिनानिमित्त संपूर्ण भारतात राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा केला जातो त्याच पार्शवभूमीवर. विद्यावर्धिनी शिक्षण संस्था संचालित, प्रगती विद्यामंदिर येथे ‘राष्ट्रीय क्रीडादिन’ साजरा करण्यात आला. शाळेत या निमित्ताने विविध मैदानी तसेच हॉल मध्ये घेण्यात येणाऱ्या स्पर्धा घेण्यात आल्या. खोखो, कुस्ती, रनिंग, बुद्धिबळ इ खेळ घेऊन मेजर ध्यानचंद यांना अभिवादन करण्यात आले. स्पर्धांचे आयोजन रमेश ससाणे, मनोज भालेराव व सुभाष सिरसाठ यांनी केले. या प्रसंगी संस्थेचे चेअरमन प्रेमचंदजी ओसवाल, अध्यक्षा मंगलाताई दुनाखे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक व मार्गदर्शन केले. या प्रसंगी मुख्याद्यापक शोभा फेगडे, मनीषा पाटील, ज्योती कुलकर्णी, शिक्षक अलका करनकर, स्नेहल उदार, भाग्यश्री तळेले, सुवर्णा पाटील, भाग्यश्री वाणी, अनिल वाघ, दिपक बारी उपस्थित होते.