Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

तात्या बाबांसारखा व्यक्ती पुन्हा होणे नाही; कै.कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील यांच्या पुण्यस्मरण कार्यक्रमाची सांगता

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
30/09/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
तात्या बाबांसारखा व्यक्ती पुन्हा होणे नाही; कै.कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील यांच्या पुण्यस्मरण कार्यक्रमाची सांगता

भडगाव(प्रमोद सोनवणे)- तालुक्यातील आमडदे येथे कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेच्या संस्थेचे संस्थापक चेअरमन कै. कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील यांच्या विसाव्या पुण्यस्मरणार्थ आयोजित पुण्यस्मरण कार्यक्रमाच्या सांगता प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भडगाव -पाचोरा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार किशोर पाटील हे होते.

तर प्रमुख पाहुणे म्हणून भडगाव- एरंडोल पारोळा विधानसभा मतदार संघाचे आमदार चिमणराव पाटील हे होते. संस्थेचे चेअरमन प्रतापराव हरी पाटील संस्थेच्या सचिव डॉ.पुनमताई पाटील, संस्थेचे संचालक प्रशांतराव विनायकराव पाटील दूध संघाचे संचालक डॉ. संजीव पाटील, निर्मलचे संचालक नरेंद्र सूर्यवंशी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिनकर देवरे, विनायक पाटील, आमडदेचे शिवाजी राजाराम पाटील, जयवंतराव आनंदराव बागल, किशोर आप्पा यांचे खंदे समर्थक गजू पाटील, दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील ,दूध संघाच्या संचालिका सुनिता पाटील, ग. स.चे माजी अध्यक्ष मनोज आत्माराम पाटील, जि प सदस्य संजय पाटील, भडगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी रमेश वाघ, युवराज पाटील, विजय भोसले, कुसुमताई पाटील, जिजाताई पाटील, शिवाजी पाटील, अशोक पाटील , सुभाष सुपडु पाटील, माधवराव पाटील, विनायक देशमुख, योजनाताई पाटील, गणेश पाटील, यांच्यासह यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात इशस्तवन आणि स्वागत गीताने होऊन कर्मवीर तात्या बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन यावेळी करण्यात आले. मान्यवरांच्या उपस्थितीत प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत, शाल, श्रीफळ, गुलाब पुष्प, देऊन करण्यात आले. यावेळी डॉ.पुनमताई पाटील यांचा विशेष सत्कार त्यांना नारीशक्ती जिल्हास्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल भडगाव पाचोरा या मतदार संघाचे लोकप्रिय आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमडदे शाळेचे प्राचार्य आर.आर. वळखंडे यांनी केले प्रास्ताविकात त्यांनी कार्यक्रमाची रूपरेषा तसेच अर्धाकृती पुतळा सुशोभीकरण याबाबत विस्तृत अशी माहिती दिली. कार्यक्रम प्रसंगी उपस्थितांमधून माजी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. संजीव पाटील यांनी प्रथम मनोगतातून सांगितले की तात्या बाबांनी आपल्या कार्याचा ठसा संपूर्ण समाजात उमटवला त्यामुळे त्यांचे या समाजावर अनंत उपकार आहेत. त्यामुळे तात्या बाबांसारखा व्यक्ती हा पुन्हा होणे नाही. हा विकासाचा महामेरू यांचे स्मरण या निमित्ताने मला त्यांचा सार्थ अभिमान वाटतो. यावेळी पारोळा -एरंडोल विधानसभा मतदारसंघाचे आमदार चिमणराव पाटील यांनी कर्मवीर तात्या बाबा यांच्या जीवनाविषयी त्यांनी मनोगतात म्हटले की तात्याबाबा हे दुर्मिळ असे राजकारणी होते त्यांच्याविषयी समाजामध्ये आदरयुक्त भीती होती. त्यांनी विविध क्षेत्रांमध्ये स्वतः नेतृत्व निर्माण केलं होतं. स्वतःच्या ताकदीवर त्यांनी किसान शिक्षण संस्थेची स्थापना करून एक समाज घडवण्याची काम त्यांनी सुरू केले. त्यांना मानणारा एक विशेष वर्ग होता आणि तो आजही आहे. तात्या बाबांना दूरदृष्टी होती. त्यांनी शिक्षणाचे जाळे विणले ग्रामीण भागात त्यांनी शिक्षणाची गंगोत्री आणण्याचा महत्त्वपूर्ण प्रयोग करून या प्रयोगाला वाटचाल देण्यासाठी प्रताप नाना यांच्या माध्यमातून शिक्षण संस्था पुढे चालवण्यासाठी आणि ती आज प्रताप नानांनी नावारूपाला आणली आहे. बाप से बेटा सवाई या उक्तीप्रमाणे प्रताप नानांचे कार्य सुरू आहे.

प्रसंगी किसान शिक्षण संस्थेचे सचिव डॉ .पुनमताई पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की संस्थेच्या प्रगतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन संस्था प्रगतीच्या मार्गावर आहे. संस्थेने सर्व शाखांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असून दरवर्षी अंतर्गत तपासणी संस्थेचे चेअरमन व त्यांचे संचालक मार्फत केली जात असते. शाळेचा आलेख उंचावण्यासाठी सतत प्रयत्नशील राहून संस्थेचे चेअरमन याविषयी नेहमी पाठपुरावा करत असतात. यावेळी त्यांनी शेतकरी बांधवांसाठी ओला दुष्काळ संपूर्ण जिल्ह्यात जाहीर करावा अशी दोघं आमदार महोदय समोर केली. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असे होते की कोरोना काळात ज्या विद्यार्थ्यांचे पालक हे दुर्दैवाने कोरोना मध्ये मृत्युमुखी पडले अशा ८० त्यांच्या पाल्यांना संस्थेच्या वतीने या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्यात आली. ज्या विद्यार्थ्यांचे आई-वडील दोघेही मयत झाली आहेत. अशा विद्यार्थ्यांची जबाबदारी संस्थेचे चेअरमन प्रतापराव हरी पाटील यांनी बारावीपर्यंतच्या त्यांची शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे.

प्रसंगी मान्यवरांच्या उपस्थितीत कर्मवीर तात्या बाबा यांच्या अर्ध पूर्णाकृती पुतळ्याचे सुशोभीकरण केले. त्याचे अनावरण करण्यात आले. तसेच तात्या बाबांच्या गॅलरीच्या देखील उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले यावेळी पाचोरा भडगाव व अन्य तालुक्यातील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन व त्यांचे सदस्य ग्रामपंचायतीचे सरपंच व त्यांचे सदस्य पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच किसान शिक्षण संस्थेचे सर्व प्राचार्य मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी हे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक भोसले, एस पी पाटील, प्रशांत सोनवणे यांनी केले. तर आभार संजीव संजय सूर्यवंशी यांनी केले.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

किसान शिक्षण संस्था उद्याची पिढी घडवणारा कारखाना;कर्मवीर तात्या बाबा यांच्या पुण्यस्मरण सांगता प्रसंगी आमदार किशोर पाटील यांचे वक्तव्य

Next Post

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातर्फे स्वच्छता कर्मचार्‍यांचा सत्कार

Next Post
गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातर्फे स्वच्छता कर्मचार्‍यांचा सत्कार

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातर्फे स्वच्छता कर्मचार्‍यांचा सत्कार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d