Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शासन सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी -मंत्री सुभाष देसाई

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
02/10/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
शासन सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी -मंत्री सुभाष देसाई

दूरदृष्य प्रणालीव्दारे पालकमंत्र्यांनी उपाय योजनांचा घेतला आढावा

औरंगाबाद(जिमाका)- अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत देण्यास शासन कटीबध्द असून शेतकऱ्यांच्या शासन सदैव पाठीशी असल्याची ग्वाही पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात दुरदृष्य प्रणालीव्दारे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतीपिकांचे नुकसान, जिवितहानी तसेच देण्यात येणाऱ्या तातडीच्या उपाययोजनांबाबत आढावा घेतला. यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, खासदार इम्तियाज जलील, आमदार सर्वश्री अंबादास दानवे, प्रशांत बंब, रमेश बोरनारे, उदयसिंह राजपुत, प्रदीप जैस्वाल, अतुल सावे दूरदृष्य प्रणालीव्दारे तर जिल्हाधिकारी सुनील चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नीलेश गटणे, अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल आदी अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित होते.

पालकमंत्री पुढे म्हणाले की, सर्व परिस्थितीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे स्वत: लक्ष ठेवुन आहेत. लवकरच विमा कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची मंत्रालयात बैठक घेणार आहेत. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून शासन सदैव शेतक-यांच्या पाठीशी असल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले.बैठकीच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची आणि तातडीने देण्यात आलेल्या मदतीची माहिती पालकमंत्री यांना दिली.

जिल्हाधिकारी म्हणाले की, जिल्ह्यात 1 जुन ते 28 सप्टेंबरपर्यंत सरासरीपेक्षा 160 टक्के पाऊस पडला आहे. पावसामुळे 6 लाख 36 हजार शेतकऱ्यांचे 4 लाख 31 हजार 928 हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील 740 किलोमीटर रस्त्यांचे नुकसान झाले असून 83 पुल वाहुन गेले आहेत. 3 शासकीय इमारतींचे तर 7 जिल्हा परीषद शाळांचे नुकसान झालेले आहे. 17 तलाव फुटल्याने 293 हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. अशा नुकसान भरपाईसाठी अंदाजे 357 कोटींची मदत अपेक्षित असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी पालकमंत्री यांना सांगितले.

यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी महाराष्ट्र राज्यासाठी नेमण्यात आलेल्या पीक विमा कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दिल्लीत बैठक घेतली असल्याचे सांगुण ते म्हणाले की जिल्ह्यातील नागद धरण फुटल्याने शेतक-यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई तात्काळ द्यावी असेही त्यांनी यावेळी सांगितले.खासदार इम्तियाज जलील यांनी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी शासनाने खंबीरपणे उभे राहुन त्यांचे मनोबल वाढवावे आणि झालेल्या नुकसान भरपाईसाठी मोठ्या पॅकेजची घोषणा करावी असे सांगितले.

यावेळी आमदार प्रशांत बंब यांनी शेतकऱ्यांना पीक विमा मिळताना येणाऱ्या अडचणी मांडल्या. नुकसान झाल्यानंतर 72 तासांच्या आत पिक विमा कंपन्यांना कळविण्याच्या नियमांची पुर्ती करताना अनेक अडचणी येत असून ही अट शिथील करण्याची विनंती पालकमंत्र्यांना केली.आमदार हरीभाऊ बागडे यांनी जिल्ह्यात सर्वत्र ठिकाणी पंचनामे करण्याबाबत प्रशासनाला निर्देश देण्याची मागणी यावेळी केली.आमदार प्रदीप जैस्वाल यांनी शहरात झालेल्या नुकसान ग्रस्तांसाठी देखील तात्काळ मदत उपलब्ध करुन देण्याबाबत सुचविले.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

संदीप काळे यांचे ‘ऑल इज वेल’ राज्यपालांच्या हस्ते प्रकाशित

Next Post

कोविड काळातदेखील स्वच्छतेची जबाबदारी मेहनतीने पार पाडणाऱ्या सफाई मित्रांचे मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक

Next Post
मंजूर पदांचा आढावा घेऊन ३० सप्टेंबरपर्यंत एमपीएससीकडे मागणीपत्र पाठवा -मुख्यमंत्र्यांचे सर्व सचिवांना स्पष्ट निर्देश

कोविड काळातदेखील स्वच्छतेची जबाबदारी मेहनतीने पार पाडणाऱ्या सफाई मित्रांचे मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d