<
जळगाव(जिमाका वृत्तसेवा)- राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची आज 2 ऑक्टोबर, 2021 रोजी सायंकाळी 7.30 आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून मुलाखत प्रसारीत होणार आहे.
‘हर घर जल’ अर्थात प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचविण्याचे शासनाचे उद्दिष्ट असून याबाबत पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे नियोजन याविषयावर पालकमंत्री श्री. पाटील हे सविस्तर माहिती देणार आहेत. नागरिकांनी ही मुलाखत जरुर ऐकावी. आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी सतीश पप्पू यांनी ही मुलाखत घेतली आहे.