<
जळगांव(प्रतिनिधी)- देवता लाईफ फाऊंडेशन, नागपूर ही कॅन्सरग्रस्त रुग्णांना मदत करणारी संस्था राज्यव्यापी रक्तदान जागरूकता अभियान राबवत आहे.
ज्याची सुरुवात आज २ ऑक्टोबर २०२१, रोजी नागपूर येथून झाली आणि ६ ऑक्टोबर २०२१ रोजी राज भवन मुंबई येथे राज्यपाल यांची भेट घेऊन, पुढे उर्वरित महाराष्ट्र दौरा करून १५ ऑक्टोबर २०२१ रोजी नागपूर येथे या अभियानाचा समारोप होईल. या अभियानांतर्गत त्यांचा प्रवास जळगाव हुन ४ ऑक्टोबर रोजी आहे या अभियानाला पाठिंबा देत भारत विकास परिषद, जळगाव शाखा तसेच जळगाव शहरातील तीनही लायन्स क्लबच्या शाखा व माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढी अशा चारही संस्थांच्या माध्यमातून रक्तदान शिबिर तसेच रक्तदान जागरूकता अभियान असे कार्यक्रम करायचे आहे.
रक्तदान शिबीर भाऊंचे उद्यान काव्यरत्नावली चौक येथे ४ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते ११ आयोजित केलेले आहे. ह्याच वेळेस शिवतीर्थ छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते भाऊंचे उद्यान अशी मोटर सायकल रॅली पण असणार आहे. भारत विकास परिषदेच्या सभासदांनी ह्या दोन्ही कार्यक्रमास आवर्जून उपस्थिती देऊन आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा.
ज्यांना शक्य असेल त्यांनी आपल्या स्वतःच्या टू व्हीलर घेऊन शिवतीर्थ-छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते भाऊंचे उद्यान रक्तदान जागरूकता अभियानात सहभागी व्हावे. तर ज्यांना अभियानात सहभागी व्हायचे नसेल त्यांनी रक्तदान शिबिराच्या ठिकाणी आपली उपस्थिती द्यावी असे आवाहन जळगांव भाविप सचिव उमेश पाटील यांनी केले आहे.