<
जळगांव(प्रतिनिधी)- येथील ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात सध्या सोशल मीडियामुळे वाढत चाललेल्या दुष्परिणाम लक्षात घेता महाराष्ट्र सायबर मुंबई,क्विक हिल फाऊंडेशन,तसेच के.बी.सी.एन.एम.यु. यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता ५वी ते १०वी च्या विद्यार्थांसाठी या कार्यक्रमात सोशल मिडिया विषयी जे गुन्हे होतात त्या पासून दूर कसे राहावे,व्हायरस चे दुष्परिणाम,मोबाईल च्या अतिवापराचे तोटे,इंटरनेट,अँटिव्हायरस हे मुद्दे लक्षात घेऊन सायबर सेफ्टी अवेअरनेस हा कार्यक्रम घेण्यात आला. याबद्दल ऐश्वर्या नितिनसिंह परदेशी,वैशाली उदयसिंह चौधरी यांनी माहिती दिली.कार्यक्रमाला मुख्याध्यापक डी.व्ही. चौधरी.शालेय समन्वयक के.जी.फेगडे.महेंद्र नेमाडे,डी.ए.पाटील,पूनम कोल्हे,सुचेता शिरसाठ,प्रतिभा लोहार, रोहिणी पाटील आदी उपस्थित होते.सूत्रसंचालन सी.बी.कोळी यांनी केले, तर आभार अतुल पाटील यांनी मानले.