<
जळगांव(प्रतिनिधी)- महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. पण, प्लॅस्टर ऑफ पॅरिस च्या गणेश मुर्तिमुळे पर्यावरणाला मोठ्या प्रमाणात हानी होते. हेच लक्षात ठेवत शहरातील लिलाई बालगृहात सामाजीक वनीकरण विभाग, अष्टविनायक शैक्षणीक व सांस्कृतीळ मंडळ, व राष्ट्रीय हरित सेनेच्या वतीने पर्यावरण पुरक गणेशमुर्ती निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. गणेशोत्सवात गणरायाच्या भक्तीचा जागर करतानाच यातून समाजाचे प्रबोधनही या उत्सावातून केले जाते. उत्सव साजरा करतांना पर्यावरणाची हानी न होता पर्यावरण पुरक उत्सव साजरा केला जावा, या साठी हरित सेने तर्फ विद्यार्थी व गणेशभक्तांना जनजागृती केली जाते. याचाच एक भाग म्हणुन विदयार्थांना हरित सेना मास्टर प्रविण पाटील, ज्ञानेश्वर कोळी, निखिल शिंदे यांनी शाडु माती पासुन पर्यावरणपुरक गणेशमुर्ती निर्मिती प्रशीक्षण दिले. त्यात शाडु माती पासुन निर्मित गणेशमुर्तीचे फायदे काय असतात हे समजावुन सांगितले. तसेच पर्यावरणाला हानी न पोहचू देता, गणेशोत्सव साजरा करण्यात यावा. असे आवाहन देखील राष्ट्रीय हरित सेने तर्फे करण्यात आले. या प्रसंगी सुनिल वाणी,कल्पना वर्मा,दिपक पाटील ,विठ्ठल पाटील हे उपस्थीत होते तसेच कार्यशाळा यशस्वीतेसाठी हरित सेना विद्यार्थी व सामाजीक वनीकरण विभाग यांनी सहकार्य केले.