Saturday, May 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या व्याख्यानाने होणार “राज्याचा अर्थसंकल्प : माझ्या मतदारसंघाच्या संदर्भात” कार्यशाळेचा समारोप

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
05/10/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या व्याख्यानाने होणार “राज्याचा अर्थसंकल्प : माझ्या मतदारसंघाच्या संदर्भात” कार्यशाळेचा समारोप

मुंबई(प्रतिनिधी)- महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील वि.स. पागे संसदीय -प्रशिक्षण केंद्रातर्फे विधिमंडळ सदस्यांसाठी विविध प्रबोधनात्मक आणि प्रशिक्षणात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. याच मालिकेत आयोजित करण्यात आलेल्या “राज्याचा अर्थसंकल्प : माझ्या मतदारसंघाच्या संदर्भात…” या संकल्पनेवर आधारित दोन दिवसीय कार्यशाळेचा समारोप बुधवार, दि. 6 ऑक्टोबर, 2021 रोजी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या व्याख्यानाने होणार आहे.

मध्यवर्ती सभागृह, विधान भवन, मुंबई येथे ही कार्यशाळा होत आहे.अर्थसंकल्प आणि त्यातील आकडेवारी समजणे क्लिष्ट, गुंतागुंतीचे असते. अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेत सन्माननीय सदस्यांचा सहभाग वाढावा, अर्थसंकल्पातील तरतुदी आणि त्यांच्या मतदारसंघातील विकास योजना यांचा सुयोग्य मेळ साधता यावा, यासाठी कार्यशाळेची आखणी व विषयांची निवड करण्यात आली आहे.

बुधवार, दि. 6 ऑक्टोबर, 2021 रोजी या कार्यशाळेस वक्ते म्हणून उद्योग मंत्री सुभाष देसाई, संसदीय कार्यमंत्री अॅड.अनिल परब असणार आहेत. कार्यशाळेचा समारोप विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या व्याख्यानाने होणार आहे.कोविड-19 च्या प्रतिबंधात्मक मार्गदर्शक सूचनांच्या अधीन राहून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व सदस्यांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन वि.स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे मानद सल्लागार हेमंत टकले, महाराष्ट्र विधानमंडळाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत आणि वि.स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक निलेश मदाने यांनी केले आहे.

Team Satymev Jayate

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

कृष्णानगरच्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी गाळेधारक, रहिवाश्यांचे पुनर्वसन करूनच जागा घ्या -मुख्यमंत्री

Next Post

समुद्राचे पाणी शुद्धीकरण प्रकल्पाबाबत सकारात्मक कार्यवाही करा -नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे

Next Post
समुद्राचे पाणी शुद्धीकरण प्रकल्पाबाबत सकारात्मक कार्यवाही करा -नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे

समुद्राचे पाणी शुद्धीकरण प्रकल्पाबाबत सकारात्मक कार्यवाही करा -नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d