<
रावेर(प्रतिनिधी)- तहसील कार्यालयात पुरवठा विभागामध्ये रेशनकार्ड मिळणे बाबत होणारा भ्रष्टाचार थांबविणे बाबत व योग्य त्या कार्यवाहीसाठी सुनील सूर्यवंशी जिल्हा पुरवठा अधिकारी जळगाव यांना भ्रष्टाचार विरोधी मोर्चा दिल्ली यांच्याकडून निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.
गेल्या बऱ्याच दिवसापासून रावेर तहसील कार्यालयातील पुरवठा विभागमध्ये मोठ्या प्रमाणावर नवीन, दुय्यम, विभक्त रेशनकार्ड मिळविणे करिता मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार भ्रष्टाचार विरोधी मोर्चा दिल्ली यांनी केली आहे. नवीन, दुय्यम, विभक्त रेशनकार्ड काढणार्या व्यक्तीकडून प्रत्येक रेशनकार्ड करिता जवळजवळ दोन हजार रुपयांची मागणी नागरिकांकडून होत असल्याचा आरोप भ्रष्टाचार विरोधी मोर्चा ने केला आहे ज्यांनी पैसे दिले त्यांचेच काम होत असल्याचे सुद्धा बोलले जात आहे.
रावेर येथील तालुका पुरवठा अधिकारी अतुल नागरगोजे यांनी प्रत्येक रेशनकार्ड धारकाकडून नवीन कार्ड काढणार्या नागरिकांसाठी तीनशे रुपये मागितल्याचा आरोप भ्रष्टाचार विरोधी मोर्चाचे गणेश मनुरे यांनी केला आहे, त्यांच्याकडे संबंधित अधिकाऱ्याचा व्हिडिओ पुरावा असल्याचे देखील बोलले जात आहे.गणेश मनुरे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, संबंधित अधिकाऱ्याने मलासुद्धा रेशन कार्ड काढण्यासाठी दोन हजाराची मागणी केली आहे.या सर्व विषयावर भ्रष्टाचार विरोधी मोर्चा दिल्ली यांच्यातर्फे जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी निवेदन देताना प्रदेशाध्यक्ष राहुलजी गंगावणे, प्रदेश महिला सदस्य वैशाली विसपुते, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनीलजी ब्राह्मणे, शांतारामजी राखुंडे, अनिल रणधीर जिल्हा उपाध्यक्ष, शेख सांडू शेख दाऊथ, प्रतिमा रोटे, शेख उस्मान शेख गंभीर, कलीम खान, सुकुर भाई, प्रवीण पाटील व असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.