<
भडगाव(प्रतिनिधी)- दोन वर्षाच्या कालावधीमध्ये कोरोना रोगाचा प्रादुर्भाव मनुष्यावर असताना सध्या जनावरांवर लम्पी आजाराचा प्रादुर्भाव भडगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.
त्यातच भडगाव तालुक्यातील तांदुळवाडी येथील शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह फक्त शेती व गुर ढोरांवरच असल्याने त्यांचे कडील होलस्टेन फ्रिजयन संकरित गाई साधारण दहा ते पंधरा गाई मधून दोन गाईंना “लम्पी स्किन डिसीज” आजारामुळे दगावल्या मुळे साधारणता एक लाख 70 हजार पर्यंत या शेतकऱ्यांची अतोनात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या घरात एक दिवस चूल देखील पेटली नाही.
त्यातच संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीने धुमाकुळ घातला आहे.सध्या भडगाव तालुक्यात “लम्पी स्किन डिसिज” या रोगाचा प्रादुर्भाव जनावरांवर मोठ्या प्रमाणात असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यातच आजूबाजूच्या गावात या रोगाचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे चाळीसगाव, पाचोरा, भडगाव या चार संसर्ग केंद्रापासून दहा किमी बाधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी निर्गमित केले आहे.
याची लक्षणे, ताप येणे, अंगावर गाठ होणे, पाय सुजणे, गाईंना उभे राहता न येणे. हा रोग हे एच एफ संकरित गाईंवर मोठ्या प्रमाणात अटॅक करतो. तांदूळवाडी येथील सुधीर रमेश पाटील यांच्या गाईचं उदरनिर्वाहाचे असल्याने एक गाय साधारण 15 लिटर दूध देणारी असून दोन गाई साधारण त्यांची किंमत एक लाख 70 असल्याने दोन गाई मृत्यू मुखी झाल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन त्यांना शासनाने गरीब शेतकऱ्याला हातभार लावा व तांदुळवाडी परिसरात गाईंवर उपचार करावे व उपाय योजना करावी, तसेच तांदळवाडी परिसरात कॅम्प घेऊन लसीकरण करण्यात यावे, असे निवेदन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना परिसरातील शेतकरी वर्ग व गुरेढोरे मालक निवेदन देण्याची तयारी करीत आहे.