<
जळगांव – मू. जे. महाविद्यालयाच्या सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथीद्वारा 3 सप्टेंबर पासून नवीन योग साधकांसाठी योग वर्गांना सुरुवात होणार आहे. या योग वर्गामध्ये नवीन साधकांना फिटनेसच्या दृष्टिकोनातून आवश्यक योग साधनातज्ञ मार्गदर्शक शिकवणार आहेत.ज्या अंतर्गत पूरक हालचाली, सूर्यनमस्कार, विविध स्थितीतील आसने, शिथिलीकरण, योगनिद्रा, श्वसनाचे व्यायाम इत्यादी प्रकार शिकवले जाणार आहेत. तसेच नियमित योगसाधना करणार्या साधकांसाठी सराव बॅच सुद्धा 3 सप्टेंबरपासून सकाळी 6 आणि 7 वाजतासुरू होणार आहे.विविध विकारांनी ग्रस्त असलेल्या साधकांसाठी सकाळी आठ वाजता उपचारात्मक योग वर्गाचे आयोजनही करण्यात आले आहे. विविध विकारावर उपचारात्मक योगसाधना या वर्गात करून घेतली जाणार आहे.सोबतच महिलांसाठी सायंकाळी पाच ते सहा दरम्यान योग साधना वर्गाचे आयोजन करण्यात आले.योगशास्त्राचे अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या माजी विद्यार्थ्यासाठी विशेष योग वर्गाचे आयोजन दुपारी 4ते 5 यावेळेत करण्यात आले आहे, याचाही विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा.
योग साधने बरोबरच औषधाविना आरोग्य प्राप्त करण्यासाठी नैसर्गिक चिकित्सा सुद्धा योग अँड नॅचरोपॅथी विभागात महिला व पुरुषांसाठी उपलब्ध आहे याचाही लाभ आरोग्य प्राप्त करुन घेण्यासाठी करावा असे आवाहन आयोजकांनी केले .
योग आणि नॅचरोपॅथी क्षेत्रात करिअरसाठी आवश्यक प्रमाणपत्र, पदविका, पदवी आणि पदव्युत्तर शैक्षणिक अभ्यासक्रम सुद्धा महाविद्यालयात उपलब्ध आहेत इच्छुकांनी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी मू. जे. महाविद्यालयाच्या सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथीयेथे किंवा 9112288110 / 9970985954 या क्रमांकावर संपर्क साधावा.